आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Vikas Dubey Kanpur Wala Arrest Madhya Pradesh Ujjain Digvijay Singh , Akhilesh Yadav Reaction

विकास दुबेच्या अटकेनंतर प्रतिक्रिया:दिग्विजय सिंग म्हणतात - भाजपच्या वरिष्ठ नेत्यामुळे नियोजित सरेंडर, तर अखिलेश यादव म्हणतात - ही अटक आहे की, सरेंडर पोलिसांनी उत्तर द्यावे

उज्जैनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रियंका गांधी म्हणाल्या - उत्तर प्रदेश पोलिस पूर्णपणे अपयशी ठरले

कानपूरच्या बकरू शूटआउट प्रकरणात गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या शोध मोहिमेत गुरुवारी नाटकीय वळण लागले. या प्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबेचे दोन सहकारी एनकाउंटरमध्ये ठार मारले गेल्यानंतर विकास पोलिसांच्या हाती लागला आहे. तो मध्य प्रदेशच्या उज्जैन येथील महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेला होता. तिथून त्याला अटक करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून तो दिल्ली, नोएडा, फरीदाबाद आणि मध्यप्रदेशात लपला असल्याची माहिती होती. मात्र आता त्याच्या अटकेनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. हे सरेंडर नियोजित असल्याचा आरोप लावला जात आहे.

दिग्विजय सिंग म्हणतात - भाजपच्या वरिष्ठ नेत्यामुळे नियोजित सरेंडर

कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंग म्हणाले की, उत्तर प्रदेश पोलिस एन्काउंटर टाळण्यासाठी नियोजित समर्पण केल्यासारखे दिसते. माझ्या माहितीनुसार मध्य प्रदेश भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यामुळे हे शक्य झाले आहे. जय महाकाल.

अखिलेश यादव म्हणाले- हे अटक आहे की आत्मसमर्पण? पोलिसांनी उत्तर द्यावे 

कानपूर प्रकरणाचा मुख्य गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात असल्याची बातमी आहे. जर हे सत्य असेल तर हे आत्मसमर्पण आहे की अटक हे सरकारने स्पष्ट करावे. त्याच्या मोबाईलची सीडीआर देखील सार्वजनिक करा जेणेकरून सत्य सर्वांसमोर येईल.

उत्तर प्रदेशचे एडीजी प्रशांत कुमार म्हणाले की, कोणतीही तथ्य जाणून न घेता असे बोलू नये 

उत्तर प्रदेशचे एडीजी प्रशांत कुमार म्हणाले की, 'कोणतीही तथ्य जाणून घेतल्याशिवाय आत्मसमर्पण केले असल्याचे बोलायला नको. आम्ही सर्वजण सतर्क होतो, विकास तिथे कसा पोहोचला (उज्जैन), याची चौकशी केली जाईल. त्याचे जेवढे साथीदार आहेत त्यांची शोध मोहिम सुरू आहे.'

शिवराज यांनी केले पोलिसांचे कौतुक 

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी विकासच्या अटकेबद्दल मध्य प्रदेश पोलिसांचे कौतुक केले. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा केली.  विकासला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. यावर दोन्ही राज्यांचे पोलिस कार्यरत आहेत.

प्रियंका गांधी म्हणाल्या - उत्तर प्रदेश पोलिस पूर्णपणे अपयशी ठरले

कानपूरच्या भयंकर हत्याकांडात यूपी सरकारने ज्या तत्तपरतेने काम करायला हवे होते. ते संपूर्णपणे अपयशी ठरले आहे. इशारा देण्यात आलेला असूनही, आरोपी उज्जैनपर्यंत पोहोचला. हे केवळ सुरक्षेचे दावे उघडकीस आणत नाही तर काही तरी मिलीभगत असल्याचा सूचक इशारा देते.

0