आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखा निकाल:जिल्हाबंदी असल्याने एकही दिवस प्रचार केला नाही, तरीही धारवाडमधून काँग्रेसचे विनय कुलकर्णी विजयी

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पूर्ण बहुमत मिळवण्याच्या मार्गावर आहे. एकूण 224 मतदारसंघांपैकी जवळपास 130 जागांवर काँग्रेसने आघाडी मिळवली आहे. भाजपची घौडदौड 70च्या आत थांबण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी तर काँग्रेस उमेदवारांनी मिळवलेल्या विजयाने लक्ष वेधून घेतले आहे.

भाजपच्या विद्यमान आमदारांचा पराभव

अशापैकीच एक निकाल म्हणजे धारवाड मतदारसंघाचा निकाल. येथून काँग्रेसचे उमेदवार विनय कुलकर्णी विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे विनय कुलकर्णी यांना धारवाड जिल्हा बंदी करण्यात आल्याने त्यांनी या मतदारसंघात एकही दिवस प्रचार केला नव्हता. तरीही त्यांनी भाजपचे विद्यमान आमदार आनंद न्यामगौडा यांचा पराभव केला.

विनय कुलकर्णींविरूद्ध अनेक गुन्हे

विनय कुलकर्णी यांच्याविरुद्ध खुनासह अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. खून प्रकरणी काही महिने ते हिंडलगा कारागृहात होते. निवडणुकीपूर्वीच ते जामिनावर बाहेर आले होते. त्यानंतर त्यांना त्यांना धारवाड जिल्हा बंदी करण्यात आली होती. मात्र, प्रचंड जनसंपर्क व लोकांशी जुळलेली नाळ या कारणामुळे काँग्रेसने त्यांना उमेदवारी जाहीर केली होती. विनय कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्जदेखील भरला. मात्र, त्यांच्यावर जिल्हाबंदीची कारवाई करण्यात आल्याने त्यांना निवडणुकीदरम्यान आपल्या मतदारसंघात जाता आले नाही.

एकही दिवस मतदारसंघात गेले नाही

विनय कुलकर्णी यांना एक दिवसदेखील आपल्या मतदारसंघात जाऊन प्रचार करता आला नाही. त्यामुळे त्यांची पत्नी, परिवाराने व कार्यकर्त्यांनी त्यांच्यातर्फे प्रचार मोहीम राबवली. त्यामुळे विनय कुलकर्णी हे निवडून येणार का?, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष होते. मात्र, आता विनय कुलकर्णी यांनी धारवड मतदारसंघातील विद्यमान आमदारांना पराभूत करून विजय मिळवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काँग्रेसने सर्व आमदारांना बंगळुरूला बोलावले

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस 129 जागांवर, भाजप 67 जागांवर, जेडीएस 22 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर आहेत. म्हणजेच काँग्रेसच्या बहुमताच्या 113च्या आकड्यापेक्षा 16 जागा जास्त आहेत. काँग्रेसला 42.8%, भाजपाला 36.1% आणि जेडीएसला 13.2% मते मिळत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेंड लक्षात घेऊन काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना बंगळुरूला पोहोचण्यास सांगितले आहे. दुसरीकडे, जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी म्हणाले की, भाजप किंवा काँग्रेसने त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही. वाचा सविस्तर

संबंधित वृत्त

बेळगावमधील पहिला निकाल हाती:दक्षिण बेळगावमध्ये भाजपचे अभय पाटील विजयी, महाराष्ट्र एकीकरण समितीला पूर्ण अपयश

पराभव मान्य करा:हनुमानाला प्रचारात उतरवले, पण बजरंगबलीची गदा भाजपच्याच डोक्यावर पडली; संजय राऊतांचा मोदी-शहांना टोला

कोण होणार कर्नाटकचा मुख्यमंत्री?:काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज, रविवारी विधीमंडळ पक्षाची बैठक; हैदराबादेत रिसॉर्ट बुक