आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे अधिकारी:विनय मोहन क्वात्रा होणार नवे परराष्ट्र सचिव, हर्षवर्धन श्रृंगलांचा कार्यकाळ चालू महिन्याच्या अखेरीस येणार संपुष्टात

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनय मोहन क्वात्रा देशाचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून लवकरच सूत्रे हाती घेतील. ते हर्षवर्धन श्रृंगला यांची जागा घेतील. श्रृंगला चालू महिन्याच्या अखेरीस आपल्या पदावरुन सेवानिवृत्त होत आहेत.

विनय मोहन सध्या नेपाळमधील भारताचे राजदूत आहेत. त्यांना परराष्ट्र सेवेचा तब्बल 32 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी सरकारमधील अनेक महत्वाच्या पदांवरही काम केले. ते फ्रान्समधील भारताचे राजदूत होते. याशिवाय राजनैतिक मोहिमेंतर्गतही त्यांनी यांनी वॉशिंग्टन, जिनिव्हा, बीजिंग व दक्षिण आफ्रिकेत काम केले आहे. पंतप्रधान कार्यालयाचे संयुक्त सचिव म्हणूनही क्वात्रा यांनी काही काळ काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...