आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. त्याच्या पत्नीने शुक्रवारी त्याच्याविरोधात मद्यधुंद स्थितीत मारहाणि केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी कांबळीविरोधात भादंवि कलम 324 व 504 अंतर्गत FIR दाखल केला आहे.
पॅनच्या हँडलने मारहाण
विनोद कांबळीने आपल्याला स्वयंपाकाच्या पॅनचे हँडल फेकून तिच्या डोक्याला दुखापत केल्याचा आरोप अँड्रिया कांबळीने केला आहे. त्याचवेळी हे प्रकरण सोडवले जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यांच्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी दुपारी 1 ते 1.30 च्या सुमारास घडली. त्यावेळी कांबळी मद्यधुंद अवस्थेत त्यांच्या वांद्रे स्थित फ्लॅटवर आला होता. तिथे त्यांनी त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली.
ही घटना कांबळीच्या 12 वर्षाच्या मुलाने पाहिली. त्याने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण तो शांत झाला नाही. त्याने स्वयंपाकघरात धाव घेतील. तेथून पॅन आणून त्याच्या हँडलने अँड्रिया यांना मारहाण केली. वांद्रे पोलिसांनी सांगितले की, विनोद कांबळी यांची पत्नी अँड्रिया प्रथम भाभा रुग्णालयात गेली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात पोहोचली.
बॅटनेही केली मारहाण
कांबळीची पत्नी अँड्रियाने तक्रारीत म्हटले आहे की, "कांबळीला शांत करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्याने विनाकारण मला व माझ्या मुलाशी शिवीगाळ केली. पॅनने मारहाण केल्यानंतर पुन्हा आम्हाला बॅटने मारहाण केली. मी त्याला रोखण्यात यशस्वी झाले. त्यानंतर मुलासह रुग्णालयात पोहोचले."
अशी होती कांबळीची कारकीर्द
विनोद कांबळीने भारतासाठी एकूण 104 एकदिवसीय व 17 कसोटी सामने खेळले. त्यात त्याने 6 शतकांसह 3,561 धावा केल्या. त्याने कसोटीत 4 व एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2 शतके ठोकली. 1991 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या कांबळीची अवघ्या 9 वर्षांत कारकीर्द संपुष्टात आली. त्याने शेवटचा सामना 2000 मध्ये खेळला. याऊलट त्याचा मित्र सचिन तेंडूलकर तब्बल 24 वर्षे देशासाठी खेळला. त्यात अनेक विक्रम रचले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.