आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:दिल्लीत फटाकेबंदीचे उल्लंघन, प्रदूषणात पुन्हा वाढ; एक्यूआय 465 वर

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीतील प्रदूषण गंभीर श्रेणीत दाखल, पावसामुळे दिलासा

वायू प्रदूषणाचा सामना करणाऱ्या दिल्ली-एनसीआरमध्ये फटाकेबंदीचे चांगलेच उल्लंघन झाले. लोकांनी दिवाळीत खूप फटाके उडवले. यामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये वायू गुणवत्ता घटून आपात स्थितीपर्यंत पाेहोचली. रविवारी सकाळी राजधानीत धुके दाटले होते. यामुळे दृश्यता खूप कमी झाली. या काळात वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ४६५ वर पोहोचला. गेल्या तीन वर्षांत दिवाळीनंतर एक्यूआय सरासरी २६ टक्के जास्त होता. २०१९ मध्ये दिवाळीनंतर एक्यूआय- ३३७, तर २०१८ मध्ये ३९० आणि २०१७ मध्ये दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी एक्यूआय- ३१९ होता. मात्र दुपारनंतर वेगवान हवा आणि रिमझिम पावसामुळे सायंकाळी गुणवत्तेत सुधारणा झाली. नंतर हवा दिशा बदलून आग्नेय दिशेने वाहणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे पेंढा जाळल्याने होणारा परिणाम कमी होईल.

राजस्थान, पंजाब, हरियाणातील अनेक शहरांत वादळी पाऊस : राजस्थान, पंजाब आणि हरियाणात रविवारी वातावरणात अचानक बदल झाला. जयपूर अाणाि बारा येथे अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. जयपूरमध्ये काही ठिकाणी गाराही पडल्या. हरियाणात हिसारमध्येही गारा पडल्या. पंजाबमध्ये लुधियाना, फिरोजपूर, पठाणकोट, संगरूर, मुक्तसर आणि अमृतसरमध्ये पाऊस झाला. हवामान खात्याने पूर्व राजस्थानातील कोटासह १० जिल्हे आणि पश्चिम राजस्थानातील श्रीगंगानगरसह ३ जिल्ह्यात अलर्ट जाहीर केला आहे.

यूपीत बंदी असूनही अनेक शहरांत फटाके उडवले

उत्तर प्रदेशात आग्रा, मुझफ्फरनगर, वाराणसी, मेरठ, हापूड, गाझियाबाद, कानपूर, लखनऊ, मुरादाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडामध्ये फटाकेबंदी असूनही दिवाळीत फटाके मोठ्या प्रमाणात फोडण्यात आले. यामुळे अनेक ठिकाणी एक्यूआय ३९६ पर्यंत गेल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितले.

पेंढा जाळण्याच्या पंजाबमधील ७४ हजार घटना, चार वर्षांत सर्वाधिक

पंजाबमध्ये २१ सप्टेंबर ते १४ नोव्हेंबरपर्यंत पेंढा जाळण्याच्या ७३८८३ घटना घडल्या आहेत. कृषी कायद्याला विरोध आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही प्रोत्साहन भत्ता न दिल्याने संतप्त शेतकरी पेंढा जाळून निषेध व्यक्त करत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...