आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Violence Against Women Escalates In Andhra Pradesh, Women Constables Deployed In Villages

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना काळ:आंध्रात महिलांविराेधात हिंसाचार वाढल्याने गावाेगावी महिला काॅन्स्टेबल, ५० घरांसाठी १ स्वयंसेवक तैनात

आंध्रच्या विजयवाडातून मनीषा भल्ला7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आंध्र प्रदेश एकाच वेळी कोरोना विषाणू आणि महिलांवरील घरगुती हिंसाचाराशी कसे लढतेय?

काेविड-१९ ने आंध्र प्रदेशच्या दुर्गम गावांतील सामाजिक कुरीतींची आणि महिलांवरील हिंसाचाराची पाेलखाेल केली आहे. लाॅकडाऊनच्या काळात महिलांविराेधात हाेणारे काैटुंबिक हिंसाचार, शाेषण इत्यादी प्रकरणे दुपटीने वाढल्याचे स्पष्ट झाले. लाॅकडाऊनपूर्वी महिलांच्या विराेधात आठवड्यात सरासरी १० केस दाखल हाेत हाेत्या. लाॅकडाऊनमध्ये त्यात आणखी भर पडून आता आठवड्यात महिलांवरील हिंसाचाराच्या २० घटना समाेर येऊ लागल्या आहेत. आंध्र प्रदेश महिला आयाेगाच्या अध्यक्षा वासी रेड्डी म्हणाल्या, लाॅकडाऊनच्या काळात आमच्याकडे दरमहिन्याला सुमारे ३०० तक्रारी आल्या. खरे तर आकडे खूप जास्त आहेत.कारण बहुतांश महिला तक्रार करण्यासाठी पाेलिस ठाणे किंवा आयाेगाकडे जात नाहीत. आंध्र प्रदेशात सर्वात जास्त प्रकरणे मद्यपान करून महिलांना मारहाण करण्याचे प्रकार जास्त आहेत. तामिळनाडूजवळील नेल्लूरच्या एका पर्यटन रिसाॅर्टचा एक व्यवस्थापक म्हणाला, एका महिला कर्मचाऱ्याला लाकडाने बेदम मारहाण करून वरच्या मजल्यावरून ढकलून देण्यात आले. या घटनेची माहिती िमळाली असून त्याच्या तपासासाठी घटनास्थळी जाण्याची घाई असल्याचे त्यांनी सांगितले. आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री मेकाथाेती सुचारिता म्हणाल्या, अशा तक्रारी वाढल्यानंतर राज्य सरकारने एक पाहणी केली. एवढ्या तक्रारी अचानक कशा वाढल्या, हा प्रश्न हाेता. या पाहणीत अनेक धक्कादायक गाेष्टी समाेर आल्या. मद्यपान करून घरी गेल्यावर महिलांना मारहाण आणि त्यांचा छळही हाेताे. त्यामुळेच दारू विक्रीची दुकाने तत्काळ बंद करण्यात आली. तेथे दारू पिण्याची सुविधा हाेती. त्याशिवाय इतर ३३ टक्के दारु दुकानेही बंद केली. दारूचे दरही वाढवण्यात आले. पाच वर्षांत दारू विक्री पूर्णपणे बंद केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी जाहीर केले आहे. दारूमधून मिळणाऱ्या महसुलाच्या पर्यायावरही िवचारविनिमय केला जात आहे.

प्रत्येक गावात ग्रामसचिवालय

बालमजुरी, महिलांवरील अत्याचार, शेतीमधील मध्यस्थाकडून हाेणारे शाेषण या समस्यांचा विचार करूनराज्य सरकारने सर्व १३ जिल्ह्यांत प्रत्येक गावात एक ग्रामसचिवालय स्थापन केले आहे. तेथे एक कार्यकर्ता, महिला पाेलिस एएनएम, आशा वर्कर, शेतकरी आणि एक संगणक आॅपरेटरची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक स्वयंसेवकाला प्रत्येकी ५० घरांची जबाबदारी दिली आहे. त्यासाठी दरमहिन्याला त्यांना ९ हजार रुपये मानधन दिले जाते. गावात काेणत्या घरात काय चालले आहे? यावर निगराणी ठेवण्याचे त्यांचे काम आहे. कुटुंबातील लाेकांचे आराेग्य कसे आहे? मारहाण हाेतेय का? काेणत्या घरात त्रास आहे? त्यांना निवृत्तिवेतन मिळते का? सरकारी रेशन मिळते का? इत्यादी गाेष्टी ताे स्वयंसेवक बघताे. स्वयंसेवकास एखाद्या कुटुंबात आराेग्यविषयक काही समस्या दिसून आल्यास त्याची माहिती वरिष्ठ आराेग्य अधिकाऱ्यास ताे कळवताे. मग अधिकारी घरी जाऊन व्यक्तीची आराेग्य तपासणी करतात.

विजयवाडा । आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी बुधवारी १०८८ रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले. त्याचे हे स्माइलीच्या मुद्रेतील छायाचित्र. नॅशनल इमर्जन्सी सर्व्हिस १०८ व राज्य हेल्थ सर्व्हिस १०४ क्रमांक आहे. रुग्णवाहिकांच्या खरेदीवर २०१ कोटी रुपये खर्च झाले. या रुग्णवाहिका वायएसआर आरोग्यश्री कार्यक्रमांतर्गत सेवा देणार आहेत.

प्रोग्रामचे सीईआे डॉक्टर मल्लिकार्जुन यांच्या म्हणण्यानुसार, १०८ क्रमांकाच्या ४१२ व १०४ क्रमांकाच्या २८२ रुग्णवाहिकांत जीवनरक्षक प्रणाली आहे. त्याशिवाय २६ नियो नेटल केअरची व्यवस्थाही आहे. कॉल येताच शहरात ही सेवा १५ मिनिटांत तर ग्रामीण भागात २० मिनिटांत मिळू शकेल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser