आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप नेत्यांनी प्रेषितांवर कलेल्या वक्तव्याविरोधात बंगालमध्ये शनिवारी हिंसाचार उसळला. पंचला बाजार भागात पोलिसांची आंदोलकांशी झटापट झाली. दगडफेकीत अनेक पोलिस जखमी झाले. हल्लेखोरांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
शुक्रवारी हिंसाचाराविरोधात दुसऱ्या गटाने शनिवार बंदचे आवाहन केले होते. बंगाल भाजप अध्यक्ष सूर्यकांत मुजुमदार यांना हावडा येथील हिंसाचारग्रस्त भागात जाताना अटक करण्यात आली. दरम्यान, बंगाल सरकारने न्यू हावडाचे पोलिस आयुक्त व अधीक्षकांची बदली केली. हावड्यानंतर मुर्शिदाबादेतही इंटरनेट बंद करण्यात आले.
आक्षेपार्ह व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून अक्कलकुवा शहरात शुक्रवारी मध्यरात्री एका गटाने तुफान दगडफेक केली व अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड व काही वाहनांची जाळपोळही केली. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला. १५ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अशी घडली घटना : नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळी काही जणांनी निषेध नोंदवत पोलिस प्रशासनाला निवेदन दिले. त्यानंतर रात्री उशिराने मोठ्या जमावाने पोलिस स्टेशनला येऊन व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवणाऱ्या युवकाला अटक करण्याच्या मागणीवरून वाद उद्भवला.
आक्षेपार्ह पोस्ट; जुन्या नाशकात तणाव
सोशल मीडियावर काही अज्ञात लोकांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे एका गटाच्या भावना दुखावल्या. त्यामुळे शुक्रवारी (१० जून) रात्री हजारो युवकांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. संशयितावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी हे लोक आक्रमक झाले होते. अखेर रात्री दीडच्या सुमारास पोलिसांनी तक्रार दाखल करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव परतला. भद्रकाली पोलिस ठाणे ते मौला बाबा दर्गा चौक तसेच दूधबाजार ते हाजी दरबार हॉटेलपर्यंत जमाव होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.