आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Violence Due To Students Coming To School Wearing Ethnic Wristbands, Ethnic Conflict In Tamil Nadu

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:जातीय रिस्टबँड घालून शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे हिंसाचार, तामिळनाडूत जातीय संघर्ष

आर. रामकुमार | चेन्नई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडूच्या शाळांमध्ये जातीय संघर्ष विकोपाला जात आहे. विद्यार्थी आपली जात दाखवणारा रिस्टबँड घालून शाळेत येत आहेत, यावरून त्याचा अंदाज येऊ शकतो. आपल्या जातीचे प्रदर्शन करण्याची वृत्ती तामिळनाडूमध्ये नवी नाही. मात्र, आता त्याने उग्र रूप धारण केले आहे. हे रिस्टबँड लाल, पिवळे, हिरवे आणि भगव्या रंगांचे आहेत. त्यातून विद्यार्थी कोणत्या वर्ग समूहाचे आहेत हे लक्षात येते. राज्याच्या वेगवेगळ्या भागांत धुमसणाऱ्या जातीय संघर्षाची कहाणी हळूहळू बाहेर येत आहे. काही शाळांत विद्यार्थ्यांमध्ये मनगटावर विविध रंगाची फीत लावण्याची प्रथा असल्याचे

जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील एका शिक्षकाने मान्य केले. हेच हिंसाचाराचे कारण आहे. तिरुनेलवेली जिल्हा पोलिस दलातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. सामाजिक कार्यकर्ते सोमा सुंदरम म्हणाले की, तामिळनाडूच्याउत्तर आणि दक्षिण जिल्ह्यांत रिस्टबँडचा ट्रेंड आहे. अनेक शाळकरी विद्यार्थी एखाद्या विशेष जातीय युनिटचे सक्रिय सदस्य आहेत. या विद्यार्थ्यांवर जाती आधारित राजकारण करणाऱ्या बड्या राजकीय नेत्यांची त्यांच्यावर छाप आहे. सरकारने कठोर पावले उचलत ही कृती वेळीस रोखली पाहिजे. सामाजिक सौहार्दासाठी हा मोठा धोका आहे. चेन्नईचे शिक्षणतज्ज्ञ गजेंद्र बाबू म्हणाले, काही जातीयवादी संघटना विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेत. ही प्रथा शाळेतील शैक्षणिक वातावरण दूषित करत आहे.

कुड्डालोरची सरकारी शाळा
मात्र, रिस्टबँड घालण्यावर बंदी आणणे आमच्या हातात नाही. विद्यार्थी वर्गात रिस्टबँड काढतात, मात्र शाळा परिसरात ते वापरतात. अशा स्थितीत आम्हाला काहीही करता येत नाही.

शिवगंगाची सरकारी शाळा
शिवगंगा जिल्ह्यात जातीय हिंसाचार झाला. हा हिंसाचार रिस्टबँडमुळे झाला. यात एका समाजाने दुसऱ्या समाजाच्या विद्यार्थ्यांवर जातीय टिप्पणी केली होती. पोलिस घटनास्थळी दाखल होताच हल्लेखोर पसार झाले. हल्ल्यात जखमी ८ वी आणि १० वीच्या दोन विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. पोलिसांनी १३ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले. कारवाईच्या मागणीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला. मानवी हक्क कार्यकर्ते काथिर म्हणाले, शाळेतील वातावरण अभिमान वाटावा असे असते. मात्र,विद्यार्थ्यांना जातीय भेदभाव करण्यात लाज वाटली पाहिजे. त्यामुळे शाळांमध्ये विशेष समुपदेशनाची गरज आहे.

तिरुनेलवेलीच्या अंबासमुद्रममध्ये पल्लक्कड पोथुक्कुडी सरकारी शाळेमध्ये गेल्या आठवड्यात जातीय संघर्षामुळे १७ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या अहवालानुसार, ओबीसी समाजाशी संबंध ठेवणारा विद्यार्थी सेल्वा सूर्याचा दलित िवद्यार्थ्याशी भांडण झाले होते. त्यानेही रिस्टबँड घातला होता. या वादात सूर्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर दोन शिक्षकांना निलंबित करण्यात आले. या घटनेनंतर तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले.

कुड्डालोरची सरकारी शाळा
काही दिवसांपूर्वी तामिळनाडूतील कुड्डालोर शहरानजीक वेल्लैकराय व्ही. कट्टपलायममध्ये सरकारी शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांत जातीय भांडणे झाली हाेती. येथेही हिंसाचार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दोन वेगवेगळ्या जातीचे रिस्टबँड घातले होते. शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार, जातीय आधारित भांडणात सहभागी होऊ नये, असे आम्ही विद्यार्थ्यांना सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...