आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Violence In Munger District Again; Vandalism Outside SP Office, Burning Of Vehicles

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहार:मुंगेर जिल्ह्यात पुन्हा हिंसाचार; एसपी कार्यालयाबाहेर तोडफोड, वाहनांची जाळपोळ

मुंगेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारमधील मुंगेरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळून आला. काही दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबाराच्या विरोधात गुरुवारी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आणि जोरदार गोंधळ घातला. आरोपींना अटक न झाल्याने संतप्त जमावाने मुंगेरच्या पोलिस अधीक्षक कार्यालयात जोरदार तोडफोड केली. पोलिस ठाण्यावर दगडफेक व वाहनांची जाळपोळ केली. दरम्यान, निवडणूक आयोगाने मुंगेरचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना हटवले. तसेच प्रकरणाची चौकशी मगधच्या विभागीय आयुक्तांकडे सोपवली आहे.

या घटनेबाबत निवडणूक आयोगाने ७ दिवसांच्या आत अहवालही मागवला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी मंगळवारी मुंगेर जिल्ह्यात दुर्गामातेच्या विसर्जनाच्या वेळी गदारोळ झाला होता. या वेळी गोळीबार आणि दगडफेक झाली होती. यात एकाचा मृत्यू झाला होता. रस्त्यावर कोंडी झाल्याने गदारोळ झाला होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार विसर्जनासाठी मूर्ती घेऊन जाताना नागरिक आणि पोलिसांमध्ये हिंसाचार झाला होता. पोलिसांनी लाठीमार केला आणि याच वेळी गोळीबार झाल्याने एका युवकाचा मृत्यू झाला होता.