आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तराखंडच्या केदारनाथ धाममध्ये भाविकांची गर्दी उसळली आहे. यामुळे प्रशासनाने शुक्रवारपासून व्हीआयपी दर्शनावर बंदी घातली आहे. पोलिस महासंचालकांनी शुक्रवारी सर्वच अतिमहत्वाचे लोक सर्वसामान्यांसारखे दर्शन घेतील असे स्पष्ट केले. यासाठी केवळ 2 तासांची वेळ दिली जाईल. या ठिकाणी योग्य नियोजनाअभावी 28 जणांचा बळी गेला आहे.
दुसरीकडे, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी आजारी भाविकांना काही दिवसांनंतर दर्शनासाठी येण्याचे आवाहन केले आहे.
6 दिवसांत लाखो भाविकांनी घेतले दर्शन
कोरोना महामारीमुळे बंद असणारी चारधाम यात्रा जवळपास 2 वर्षांनी पूर्ववत सुरू झाली आहे. त्यामुळे केदारनाथमध्ये भाविकांची गर्दी उसळली आहे. मागील 6 दिवसांत जवळपास 1 लाख 30 हजार जणांनी दर्शन घेतले. यामुळे प्रशासनाने व्हीआयपी प्रवेशांवर बंदी घातली आहे.
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू
प्रशासनाचा बेजबाबदारपणा व योग्य नियोजनाअभावी आतापर्यंत अनेक जणांचा बळी गेला आहे. रुद्रप्रयागहून 11 आजारी व्यक्तींना विमानाद्वारे अन्य ठिकाणी पाठवण्यात आले. स्थिती एवढी वाईट होती की चेंगराचेंगरी व लाठीचार्जची स्थिती उद्भवली. केदारनाथसह बद्रीनाथ व यमुनोत्रीतही प्रशासनाच्या बेजबाबदारपणा दिसून आला आहे.
दर्शनासाठी केवळ 2 तास
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, चारधाम यात्रेला येणाऱ्या सर्वच भाविकांना आता एका रांगेत उभे राहून दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागेल. रांगेत उभ्या असणाऱ्या भाविकांना अवघ्या 2 तासांत दर्शन आटोपण्याचे निर्देश देण्यात आलेत.
सुरक्षेसाठी पोलिस तैनात
प्रशासनाने भाविकांची वाढती गर्दी पाहून मंदिराात आयटीबीपी व एनडीआरएफचे जवान तैनात केलेत. तसेच भाविकांना मंदिर मार्गात पोलिसांचे जवानही मदत करत आहेत. गत काही दिवसांत प्रशासनाने मोठा हलगर्जीपणा केला होता. यामुळे आता कठोर पाऊले उचलली जात आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.