आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना चिरडल्याचा नवीन व्हिडिओ:वृद्ध शेतकऱ्याला इतकी जोरदार धडक की आधी बोनटवर नंतर जमीनीवर आदळला, प्रियंका गांधींनी शेअर केला धक्कादायक व्हिडिओ

लखीमपूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे आंदोलक शेतकऱ्यांवर दोन वाहने घातल्या प्रकरणी आरोपी आशिष मिश्रा (केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा) याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांवर हल्ला केल्याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये काही शेतकरी गाडीच्या धडकेनंतर जमिनीवर पडल्याचे दिसून येत आहे, तर काहीजण जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहेत आणि घटनास्थळी गोंधळ उडाला.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शेतकरी हातात झेंडे घेऊन पुढे जात आहेत, तेवढ्यात सायरन वाजवत जीप मागून येते आणि अनेक लोकांना पायदळी तुडवते. भरधाव जीपच्या धडकेत अनेक जण जखमी झाले. जीपच्या धडकेनंतर एका वृद्ध उडून बोनेटवर गेले आणि नंतर जमिनीवर पडले. व्हिडिओमध्ये जीपच्या मागे एक एसयूव्ही देखील दिसत आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधी नेत्यांनी भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. आधी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि नंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. पोलिसांनी या व्हिडिओची पुष्टी केली नाही, किंवा वाहन कोण चालवत होता हे स्पष्ट नाही. लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचारात 4 शेतकऱ्यांसह 8 लोकांचा मृत्यू झाला आहे.

राहुल म्हणाले - कोठडीत ठेवले आहे, ती घाबरत नाही
प्रियंका गांधींच्या अटकेवर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, कोठडीत ठेवले आहे ती घाबरत नाही. ती खरी काँग्रेसी आहे, हार मानणार नाही. सत्याग्रह थांबणार नाही. दुसरीकडे, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे की अन्न देणाऱ्यांना कारने चिरडून टाकणारे आणि तिचे अश्रू पुसणाऱ्या प्रियंका गांधी अटक करून 30 तास कोठडीत? ना गुन्हा सांगितला, ना न्यायालयात सादर केले.

बातम्या आणखी आहेत...