आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mallikarjun Kharge Rahul Gandhi Viral Video | Bharat Jodo Yatra | Rajasthan News

मल्लिकार्जुन खरगे यांनी कुरवाळली राहुल गांधींची दाढी:गांधी कुटुंबासोबत असलेल्या नात्यांची दिसली झलक

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत जोडो यात्रेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यासपीठावरच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दाढी कुरवाळली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये हलक्याफुलक्या पद्धतीने संवाद सुरू असल्याचे दिसत आहे. या घटनेवरून खरगे आणि गांधी घराण्यातील नात्यांचा प्रेमळपणा दिसून आला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील 'भारत जोडो यात्रेने' तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रासह मध्य प्रदेशमधील प्रवास पुर्ण केला असून आता राजस्थानमध्ये यात्रा शेवटच्या टप्प्यात आहे. आज अलवर जिल्ह्यात भारत जोडो यात्रेत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. राहुल यांना भेटण्यासाठी आणि यात्रेत सहभागी होण्यासाठी इतर जिल्ह्यातूनही हजारो लोक पोहोचत आहेत. ही यात्रा सुरू झाल्यापासूनच राहुल गांधींच्या दाढीवरून राजकारण सुरू आहे.

यापुर्वीही भाजपाच्या नेत्या, खासदार पूनम महाजन यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला होती. "दाढी वाढवून कोणी मोदी होत नाही. राहुल गांधी लोकांना भ्रमित करताहेत, असे त्या म्हणाल्या होत्या. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनीही राहुल गांधी सद्दाम हुसेन यांच्यासारखे दिसत असल्याचे म्हटले होते. यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.

मल्लिकार्जुन खरगे यांनी 19 डिसेंबर रोजी अल्वरमधील मलाखेडा येथे एका जाहीर सभेत राहुल गांधींची दाढी कुरवाळली.
मल्लिकार्जुन खरगे यांनी 19 डिसेंबर रोजी अल्वरमधील मलाखेडा येथे एका जाहीर सभेत राहुल गांधींची दाढी कुरवाळली.

आज भारत जोडो यात्रा सकाळी अलवर शहरातील काटीघाटी पार्क येथून सुरू झाली होती. यात्रेच्या पहिल्या टप्प्यात रामगढ परिसरातील लोहिया का तिबारा येथे दुपारचे जेवण झाले. तर यात्रेचा सायंकाळचा टप्पा दुपारी साडेतीन वाजता बगाड चौकातून सुरू झाला. यात्रेचा रात्रीचा विसावा रामगडच्या बिजवा गावात ठेवण्यात आला आहे. आज एकूण 23 किलोमीटरचा प्रवास यात्रा पुर्ण करत आहे.

'यात्रा आमच्यासाठी वरदान'

राहुल गांधींचा दौरा आमच्यासाठी वरदान ठरत आहे. प्रत्येक भेट एक संदेश देते, पुढील अर्थसंकल्पात सामाजिक सुरक्षेवर लक्ष केंद्रित करायचे आहे, असा संदेश या भेटीतून मिळाला आहे, असे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. भाजपचे लोक गोबल्सचे नातेवाईक आहेत, तुम्ही शंभर वेळा खोटे बोललात तर लोक ते सत्य समजू लागतात. भाजप तसेच खोटे बोलत आहे. भाजपला लाज वाटली पाहिजे. आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही, असा दावा भाजप करत आहे. पण, वास्तवातआमच्या सरकारने 14 लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले.

इंग्रजी भाषेवर रंजक संवाद
पत्रकार परिषदेदरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि जयराम रमेश यांच्यात रंजक संवाद झाला. राजस्थान सरकारच्या योजनांसाठी राहुल गांधींनी केलेल्या कौतुकाचा उल्लेख अशोक गेहलोत यांनी केला. आपण राज्यात इंग्रजी शाळांचे जाळे उभारू. मी लहानपणापासून इंग्रजीच्या विरोधात आहे, असे गेहलोत यांनी म्हणताच जयराम रमेश हे हसायला लागले. यावर बघा हे हसत आहेत, असे गेहलोत म्हणाले. तर जयराम रमेश म्हणाले की, वैभव इंग्लिशचा आहे. यावर गेहलोत हसले आणि म्हणाले की, तुम्ही ते सोडा, मी वेगळंच बोलतोय. मी विरोधात होतो. कारण त्यावेळी वातावरण तसे होते. दक्षिणेत हिंदीच्या विरोधात, उत्तरेत इंग्रजीच्या विरोधात आंदोलने झाली होती.

मंत्र्यांनी महिन्यातून एक दिवस पायी फिरले पाहिजे, असा सल्ला राहुल यांनी दिला होता. याची पुढील महिन्यापासून अंमलबजावणी करण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. 26, 27 जानेवारीपासून मंत्री, आमदार आणि संघटनेचे पदाधिकारी एक दिवस पायी फिरणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह दोतासरा यांनी सांगितले. आम्ही लवकरच तारीख निश्चित करू. मंत्रिपदावर राहायचे असेल, तिकीट मिळवायचे असेल, संघटनेत पद मिळवायचे असेल, तर महिन्यातून एक दिवस पायी चालावे लागेल.

उद्या यात्रा हरियाणात दाखल

21 डिसेंबरला सकाळी पहिल्या टप्प्यात यात्रा हरियाणात दाखल होईल. अलवर हा राहुल गांधी यांचे निकटवर्तीय काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री भंवर जितेंद्र सिंह यांचा मतदारसंघ आहे. राहुल यांच्या दौऱ्याच्या स्वागताची अनेक दिवसांपासून परिसरात जय्यत तयारी सुरू होती. जिल्ह्यातील शकुंतला रावत आणि टिकाराम जुली हे गेहलोत सरकारमध्ये मंत्री आहेत.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी राहुल गांधींसोबत यात्रेत चालले.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी राहुल गांधींसोबत यात्रेत चालले.

आज मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशिवाय पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नीही यात्रेला गेले होते. दोन्ही नेते एकमेकांचा हात धरून चालताना दिसले. राहुल यांच्यासोबत काँग्रेसचे स्थानिक आमदार आणि अनेक मंत्रीही होते. त्याचवेळी माजी केंद्रीय सचिव आणि अर्थतज्ज्ञ अरविंद मायाराम हेही मंगळवारी यात्रेत सहभागी झाले होते.

राजस्थान काँग्रेसचे राजकारण
राहुल गांधींच्या दौऱ्याचे राजस्थान काँग्रेसवर अनेक राजकीय परिणाम आहेत. सीएम अशोक गेहलोत आणि सचिन पायलट गटामधील या भेटीमुळे राजकीय युद्धविराम झाला. राहुलची यात्रा संपल्यानंतर आता दोन्ही गटामधील शांतता अबाधित राहते की पुन्हा भांडणे वाढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...