आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोहलीचे बर्थडे सेलिब्रेशन, VIDEO:संघासोबत केली मस्ती अन् धमाल, विराटने 'केक' कापताना केली एक मोठी गोष्ट

मेलबर्नएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाची रन मशीन विराट कोहलीचा शनिवारी 34 वा वाढदिवस झाला. टी-20 विश्वचषकाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असणाऱ्या विराटने हा वाढदिवस आपल्या संघाच्या सहकाऱ्यांसोबत साजरा केला. भारताचे मेंटल हेल्थ अँड कंडीशनिंग कोच पॅडी अप्टन यांचाही आज बर्थडे आहे. कोहली व अप्टन यांनी एकत्रच केक कापला. याशिवाय विराटने भारतीय क्रीडा पत्रकारांसोबतही आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी तो म्हणाला - 'मला केवळ एकच केक कापणे आवडेल. जो पुढील आठवड्यात 13 नोव्हेंबरला कापला जाईल.'

तत्पूर्वी, विराट आपल्या संघ सहकाऱ्यांसोबत चांगलीच मजा-मस्ती करताना दिसून आला. कर्णधार रोहित शर्माने त्याच्या चेहऱ्यावर केक माखला. विराट जेव्हा अर्शदिपला केक लावण्यासाठी गेला तेव्हा तो पळून जाताना दिसला. हा व्हिडिओ BCCIने पोस्ट केला आहे.

प्रथम पाहा, बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोज...

विराट कोहलीचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीत झाला.
विराट कोहलीचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीत झाला.
टीम इंडियाचे मेंटल हेल्थ अँड कंडीशनिंग एक्सपर्ट ओडी उपटन यांचाही 5 नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे.
टीम इंडियाचे मेंटल हेल्थ अँड कंडीशनिंग एक्सपर्ट ओडी उपटन यांचाही 5 नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे.
विराट कोहलीच्या नावे 71 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. तो सर्वाधिक शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्याहून जास्त सचिनने 100 शतक ठोकलेत.
विराट कोहलीच्या नावे 71 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. तो सर्वाधिक शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्याहून जास्त सचिनने 100 शतक ठोकलेत.

मैदानावर चाहत्यांचे सेलिब्रेशन

टीम इंडियाच्या केक पार्टीसह विराटच्या चाहत्यांनी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर जति सप्रूसोबत त्याचा वाढदिवस साजरा केला.

हैदराबादेत लागले सर्वात मोठे कट आउट

या धामधुमीत विराटच्या हैदराबादमधील चाहत्यांनी त्याचे तब्बल 35 फूट उंच कट आउट लावले आहे. हे एखाद्या क्रिकेटरचे आतापर्यंतचे सर्वात मोठे कट आउट मानले जात आहे.
या धामधुमीत विराटच्या हैदराबादमधील चाहत्यांनी त्याचे तब्बल 35 फूट उंच कट आउट लावले आहे. हे एखाद्या क्रिकेटरचे आतापर्यंतचे सर्वात मोठे कट आउट मानले जात आहे.

RCBने सुपरमॅनसारखे दाखवले

रॉयल चॅलेन्जर बंगळुरूने विराटचा सुपरमॅन अवतार दाखवला आहे. संघाने एक फोटो पोस्ट करत विराटला शुभेच्छा दिल्यात. फ्रेंचायजीने अन्य एका पोस्टमध्ये डिव्हिलियर्सने विराटला दिलेल्या शुभेच्छाही पोस्ट केल्यात.

आता पाहा, विराटला कुणी व कशा दिल्या शुभेच्छा

कोहलीचा वाढदिवस सोशल मीडियावरही ट्रेंड करत आहे. त्याच्या चाहत्यांनी विविध पोस्ट करून त्याला शुभेच्छा दिल्या. खाली काही निवडक पोस्ट वाचा...

एबी डिव्हिलियर्सचा व्हिडिओ RCBने केला पोस्ट...

मोइन अली

युवराज सिंह

बातम्या आणखी आहेत...