आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Virat Kohli Restaurant Controversy; LGBTQIA Community Accused One8 Commune Of Not Giving Entry

कोहलीच्या रेस्तराँमध्ये समलैंगिकांना ​​​​​​​नो एंन्‍ट्री!:लोक संतापल्यानंतर रेस्तराँने दिले स्पष्टीकरण, म्हणाले- सरकारी नियमांनुसार, तरुणांना एकटे येण्यास मनाई आहे

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेस्तरॉ

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या वन8 कम्यून रेस्तराँवर LGBTQ+ समुदायातील लोकांना प्रवेश न दिल्याचा आरोप आहे. 'Yes, We Exist' नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एका पोस्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, 'LGBTQ+ पाहुण्यांना विराट कोहलीच्या रेस्तराँमध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाही. कोहली पुणे, दिल्ली आणि कोलकाता येथे वन 8 कम्यून नावाचे रेस्तराँ चालवतो. त्यांच्या झोमॅटो लिस्टिंगमध्ये म्हटले आहे की रेस्तराँटमध्ये स्टॅगसाठी प्रवेश नाही.

पोस्टमध्ये म्हटले आहे की कोहलीच्या रेस्तराँमध्ये समलिंगी पुरुषांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे, तर समलिंगी महिलांना ड्रेसच्या आधारावर प्रवेश मिळतो. भारतातील अशा फॅन्सी रेस्टॉरंट्स, बार आणि क्लबमध्ये LGBTQ विरुद्ध भेदभाव सामान्य आहे. विराट कोहलीही तेच करतो आहे.

या पोस्टनंतर लोकांमध्ये नाराजी आहे. विराट कोहलीविरोधात सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. त्याचबरोबर काही लोक या पोस्टला फेक म्हणत आहेत.

आरोपांवर वन 8 कम्यूनने दिली सफाई
वन8 कम्यूनने या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'आम्ही कोणताही भेदभाव न करता सर्व लोकांचे स्वागत करतो आणि त्यांचा आदर करतो. आमच्या नावाप्रमाणे... आम्ही सेवेशी संबंधित कामात नेहमीच अग्रेसर असतो. उद्योगधंदे आणि सरकारी नियम लक्षात घेता, आमच्याकडे स्टॅग एंट्रीवर बंदी आहे. याचा अर्थ आपण कोणत्याही समाजाच्या विरोधात आहोत किंवा कोणाचाही अपमान करत आहोत असा होत नाही.

'ग्राहक हेच आमचे प्राधान्य'
वास्तविक, 'रेस्टॉरंटमध्ये स्टॅगसाठी प्रवेश नाही' म्हणजेच येथे मुलगा एकटा जाऊ शकत नाही, त्याच्यासोबत महिला जोडीदार असणे आवश्यक आहे. पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, असे असूनही, जर काही अनावधानाने घटना घडली असेल किंवा कोणत्याही प्रकारचा चुकीचा संवाद झाला असेल, तर त्या व्यक्तीने आम्हाला भेटावे, जेणेकरून हा वाद योग्य प्रकारे मिटवला जाईल. आमचे प्राधान्य आमचे ग्राहक आहेत. ग्राहकांशी मजबूत आणि दीर्घकालीन संबंध निर्माण करणे हा आमच्या प्रणालीचा एक भाग आहे.

बातम्या आणखी आहेत...