आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेन-प्लॅटफॉर्ममध्ये अडकली मुलगी:गुंटूर एक्स्प्रेसमधून उतरताना घसरली, वेदनेने ओरडत होती; फलाटचा कठडा फोडून बाहेर काढले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंध्र प्रदेशातील दुव्वाडा स्टेशनवर हा अपघात झाला.

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील दुव्वाडा स्टेशनवर गुंटूर रायगड एक्स्प्रेसमधून उतरताना एक महाविद्यालयीन विद्यार्थीनी ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्यामधात अडकली. ही घटना बुधवारची आहे. मुलगी पडताना पाहून लोकांनी ट्रेन थांबवली. यानंतर फलाट तोडून मुलीला बाहेर काढण्यात आले आहे.

मुलगी ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकली तेव्हा ती वेदनेने ओरडत होती. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रुग्णालयात दाखल
मुलीला बाहेर काढण्यासाठी जीआरपी, आरपीएफ आणि रेल्वे अभियंते घटनास्थळी पोहोचले. ट्रेनमध्ये अडकलेली बॅग बाहेर काढून त्यांनी मुलीला दिलासा दिला. त्यानंतर फलाटाचा कठडा तोडून तिला बाहेर काढले. या अपघातात मुलीलाही काही दुखापत झाली होती. त्यामुळे तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

23 वर्षीय शशिकला ही अन्नावरम येथील रहिवासी आहेत. ती अभियांत्रिकीची विद्यार्थिनी आहे आणि विशाखापट्टणममधील महाविद्यालयात दररोज ट्रेनने जाते. आजही ती कॉलेजला निघाली होती.. तेव्हा तिच्यासोबत ही घटना घडली. सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर तिला बाहेर काढण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...