आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Visually Impaired Haryana Girl Supriya Who Secured 2 Marks In Maths, Got 100 Out Of 100 Marks After Re Checking

हरियाणा बोर्डाचा विचित्र न्याय:दृष्टिहीन सुप्रियाला गणिताच्या पेपरमध्ये 100 पैकी फक्त 2 गुण मिळाले, 5000 हजार रुपये खर्चून री-चेकिंग केल्यानंतर मिळाले संपूर्ण 100 गुण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हरियाणा प्रशालेने 10 जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर केला

हरियाणा शालेय शिक्षण मंडळाच्या (बीएसएचई) दहावीची दृष्टीबाधित विद्यार्थिनी सुप्रियाला दहावी बोर्डाच्या परीक्षेत गणितामध्ये फक्त 2 गुण मिळाले होते. यावर सुप्रियाने बोर्डवर उत्तरपत्रिका तपासणीत योग्य प्रक्रियेचा पालन न केल्याचा आरोप करत री-चेकिंगसाठी अर्ज केला. आश्चर्यकारक बाब म्हणजे यानंतर तिला गणितात पूर्ण 100 गुण मिळाले.

सामान्य मुलांसोबत तपासली उत्तरपत्रिका

सुप्रियासारख्या विद्यार्थ्यांसाठी असा नियम आहे की ते परीक्षेत लेखक सोबत घेऊन जाऊ शकतात. गणिताचा पेपर इतर सर्व विषयांपेक्षा वेगळा असतो. यामध्ये ए, बी आणि सी कोडची प्रश्नपत्रिका असते. रायटरचे काम प्रश्न सांगणे आणि परीक्षार्थी जे उत्तर देईल ते लिहिण असते. छज्जू रामने सांगितले की, सुप्रियाच्या गणिताची उत्तरपत्रिका सामान्य विद्यार्थ्यांसोबत तपासली होती. यामुळे तिची उत्तरे वेगळी दिसली आणि तिला फक्त 2 गुण मिळाले होते.

वडिलांनी री-चेकिंगसाठी केला अर्ज

अर्धदृष्टी असलेली सुप्रिया म्हणते की, 'गणितात मिळालेले 2 गुण पाहून मी हैराण आणि दुःखी होते. यानंतर तिच्या वडिलांनी री-चेकिंगसाठी अर्ज केला आणि री-चेकिंगनंतर मला 100 गुण मिळाले. सुप्रिया म्हणाली की, यानंतर बोर्डाने इतर कोणत्याही दिव्यांग विद्यार्थ्यासोबत असे करू नये अशी मागणी करते.'

री-चेकिंगसाठी खर्च झाले 5 हजार रुपये

सुप्रियाचे वडील छज्जू राम सांगतात की, सुप्रियाला सर्व विषयांत 90 पेक्षा अधिक गुण मिळाले, मात्र गणितात फक्त 2 गुण मिळाल्यानंतर त्यांनी री-चेकिंगसाठी अर्ज केला. यासाठी त्यांना 5000 रुपये खर्च आला. यानंतर तिला संपूर्ण 100 गुण मिळाले.

बातम्या आणखी आहेत...