आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vodafone Idea Latest News And Update I Company Offered To Buy A Stake At Price Rupess 10

सरकार व्होडा-आयडियात घेऊ शकते भागीदारी:कंपनीने 10 रुपयात हिस्सा घेण्याची दिली ऑफर; कर्जाची परतफेड करण्यासाठी उचलले पाऊल

नवी दिल्ली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेअरची किंमत 10 रुपयांवर स्थिर झाल्यावर सरकार कर्जबाजारी दूरसंचार कंपनी व्होडाफोन-आयडिया लिमिटेड (VIL) मधील भागभांडवल विकत घेऊ शकते. अधिकृत सुत्रांकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. पीटीआयनुसार, सुत्रांकडून सांगण्यात आले की, बाजार नियामक सेबीच्या निकषांनुसार, अधिग्रहण केवळ सममूल्यावरच केले पाहिजे. VIL च्या शेअरची किंमत 10 रुपयांच्या आसपास स्थिर झाल्यानंतर DoT भागभांडवल खरेदीला मान्यता देईल.

कंपनीवर सुमारे 16,000 कोटींचे देणे ​​​​​​

VIL वर व्याज म्हणून सरकारला सुमारे 16,000 कोटी रुपये द्यावे लागतील. या दायित्वाच्या बदल्यात कंपनीच्या संचालक मंडळाने सरकारला प्रति समभाग 10 रुपये भागभांडवल देण्याची ऑफर दिली आहे. या स्टेकच्या अधिग्रहणानंतर, VIL मधील सरकारची हिस्सेदारी सुमारे 33 टक्के होईल. तर कंपनी प्रवर्तकांची हिस्सेदारी 74.99 टक्क्यावंरून 50 टक्क्यांवर येईल.

नवीन गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेतला
व्होडाफोन इंडियाचे प्रवर्तक आणि अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला हे आहेत. कंपनीत 27% आणि UK कंपनी Vodafone PLC मध्ये 44% हिस्सा त्याच्याकडे आहे. कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप 31,200 कोटी रुपये आहे. कंपनीची वाईट स्थिती पाहून दोन्ही प्रवर्तकांनी कंपनीत नवीन गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीवर 1.91 लाख कोटींचे कर्ज
VIL (व्होडा आणि आयडीया) कंपनीवर 30 सप्टेंबर 2021 पर्यंत एकूण 1,94,780 कोटींचे कर्ज होते. एप्रिल-जून 2022 च्या तिमाहीअखेर हे कर्ज 1,99,080 कोटींवर आले आहे.

गुरुवारी शेअर 9.68 रुपयांवर बंद
व्हीआयएलचे शेअर्स 19 ऑगस्टपासून 10 रुपयांच्या खाली व्यवहार करत आहेत. गुरुवारी, त्याचा स्टॉक बीएसईवर 1.02% कमी होऊन 9.68 रुपयांवर बंद झाला होता.

जिओनंतर दोन कंपन्या एकत्र झाल्या होत्या

रिलायन्स जिओच्या आगमनानंतर बिर्लाची आयडिया आणि व्होडाफोन यांचे एकत्रीकरण झाले. यानंतर भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) संदर्भात चार दूरसंचार कंपन्या देशात आघाडीवर राहिल्या. व्होडाफोन आयडिया सतत तोट्यात आहे. अलीकडेच ही कंपनी बुडणार असल्याची चर्चा होती. व्होडाफोन आयडिया ही देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी आहे.

बातम्या आणखी आहेत...