आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Voice Disorder Is Difficulty Speaking: Slurred Speech, Hoarseness, Can Be Exacerbated By Drinking Too Little Water And Too Much Caffeine.

व्हाइस डिसऑर्डर म्हणजे बोलण्यात अडचण:चित्रविचित्र आवाज काढणे ,आवाजात जडपणा, कमी पाणी, जास्त कॅफीनमुळे वाढते समस्या

लेखक: मर्झिया जाफर23 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

बोलता बोलता घसा दुखत असेल आणि तणाव असेल तर ते व्हाइस डिसऑर्डरचे लक्षण असू शकते. व्होकल कॉर्ड्स नीट कंपन करत नसल्यामुळे असे घडते. त्याची काळजी कशी घ्यायची, सांगत आहेत ईएनटी सर्जन डॉ. पंकज गुलाटी-

व्हाइस डिसऑर्डरचे कारण

डॉ गुलाटी म्हणतात की व्हाइस डिसऑर्डर कोणत्याही कारणांमुळे होऊ शकतो. यामध्ये आवाज बसतो, पिच कमी होतो आणि आवाजातही बदल होतो. व्हाइस डिसऑर्डरची अनेक कारणे असू शकतात. चला त्याबद्दल जाणून घेऊया…

तुम्ही कोणत्या व्यवसायात आहात

डॉक्टर म्हणतात की जर तुम्ही एखाद्या अशा व्यवसायात असाल जसे तुम्ही गायक, अँकर, शिक्षक यांसारखे खूप बोलायच्या व्यवसायात असाल तर तुम्हाला व्हाइस डिसऑर्डर होऊ शकतो. जास्त बोलल्याने घशात सूज येते, त्यामुळे बोलताना घशात त्रास होतो.

स्मोकिंग

स्मोकिंग हे एखाद्या व्यक्तीसाठी फॅशन किंवा कूल डूड म्हणून स्टेटस सिम्बॉल असू शकते, परंतु ते हृदयासाठी तसेच मेंदूसाठी हानिकारक आहे. डॉ गुलाटी सांगतात की जेव्हा एखादी व्यक्ती स्मोकिंग करते तेव्हा त्याच्या व्होकल कॉर्ड्स मध्ये कंजेशन (स्वरात रक्तसंचय) होते, त्यामुळे ही समस्या उद्भवते.

स्मोकिंग केल्याने चांगला आवाज खराब होऊ शकतो

इंडियन आयडॉल 11 चे जज आणि गायक विशाल ददलानी यांनी त्याच्या इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये खुलासा केला होता की तो एका दिवसात 40 हून अधिक सिगारेट ओढत असे. विशालने सांगितले की, त्याने ऑगस्ट 2019 मध्ये धूम्रपान सोडले. सिगारेट ओढल्यामुळे त्याचा आवाज खराब होत होता, रेंज, कंट्रोल, टोन, सगळं काही गडबडत होतं. सिगारेट सोडल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी त्याचा आवाज कमी झाला. सिगारेट ओढल्याने घसा आणि फुफ्फुसांना सूज येऊ शकते ज्यामुळे आवाज खराब होतो.

व्हॉइस डिसऑर्डरमुळे व्होकल कॉर्ड कॅन्सर देखील होऊ शकतो

न्यूरोलॉजिकल समस्या

काही वैद्यकीय अटींमुळे व्होकल कॉर्ड्स नियंत्रित करणाऱ्या नसांना नुकसान होते. गळाच्या मज्जातंतूंना गंभीर दुखापत किंवा शस्त्रक्रियेने देखील दुखापत होऊ शकते. यामुळे आवाजात अडचण येते किंवा म्हणा की व्हाइस डिसऑर्डर दिसून येतो.

व्होकल कॉर्डवर अतिरिक्त टिश्यू

काही प्रकरणांमध्ये, घशातील व्होकल कॉर्डवर अतिरिक्त टिश्यू तयार होऊ शकतात. ही अतिरिक्त वाढ व्होकल कॉर्डला सामान्यपणे काम करण्यापासून प्रतिबंधित करते, ज्यामुळे व्हाइस डिसऑर्डरचे होतो. ही वाढ अल्सर आणि गाठीच्या स्वरूपात असू शकते.

आवाजामध्ये बदल होण्यापासून सावधानी आणि उपचार

डॉ गुलाटी सांगतात की, व्हाइस डिसऑर्डरवर त्यांची कारणे तपासून उपचार केले जातात. जर उपचारातून योग्य ते परिणाम मिळत नसेल तर शस्त्रक्रिया केली जाते. जर घशाचा कर्करोग असेल तर त्यावर वेगळ्या पद्धतीने उपचार केले जातात. डॉ गुलाटी यांनी सांगितले आहेत व्हाइस डिसऑर्डर टाळण्यासाठी खालील उपाय-पाहुया…

 • तुम्ही जर बोलण्याच्या व्यवसायात असाल तर बोलताना तुमच्या आवाजावर जास्त दबाव आणू नका.
 • व्हॉइस मॉड्युलेशन करा. घशावर दाब पडू नये म्हणून कमी आणि हळू बोला.
 • वाफ घेतल्याने घशात आराम मिळतो.
 • अ‍ॅसिडिटी असेल तर औषध घ्यावे म्हणजे घशाचा त्रास कमी होतो.
 • घशात सूज असल्यास आवाजाला विश्रांती द्यावी. आवश्यक तेवढेच बोला.
 • व्होकलमध्ये स्वच्छता राखा, त्यानेदेखील आराम मिळतो

व्हाइस डिसऑर्डर मध्ये बोलण्यात अडचण येते. ही समस्या अनेक कारणांमुळे उद्भवते. हे टाळण्यासाठी, सुरुवातीच्या लक्षणांवर उपचार करणे आवश्यक आहे.

चुकीच्या सवयींमुळे व्होकल कॉर्ड खराब होऊ शकते

जर तुम्हाला गायन, बातम्या वाचन, डबिंग, अभिनय किंवा टीव्ही होस्ट यासारख्या व्यवसायात जायचे असेल तर तुमच्या करिअरमध्ये आवाजाची मोठी भूमिका असते. लहानपणापासून झालेल्या छोट्या-छोट्या चुकांमुळे आवाज खराब होऊ शकतो. व्होकल कॉर्डवर वाईट परिणाम करणाऱ्या अनेक सवयी आहेत. व्होकल कॉर्ड हे यंत्र आहे जिथून आपला आवाज बाहेर येतो. आम्ही तुम्हाला अशा वाईट सवयी सांगत आहोत, ज्यामुळे व्होकल कॉर्ड खराब होतो.

पाणी कमी पिणे

पाणी कमी पिल्यामुळे आवाज जड होऊ शकतो. व्होकल कॉर्ड्स किती वेगाने कंपन करतात आणि त्याच्यामुळे आवाज येतो यावर विश्वास ठेवणे खरं तर कठीण आहे. तर अशा स्थितीत त्याला योग्य लुब्रिकेशन मिळाले नाही तर आवाज हा नक्की बदलेल. आवाजामुध्ये तो ओलसरपणा नाजूकपणा नसतो. त्यामुळे स्टेजवर बोलण्यापूर्वी वक्ता किंवा कलाकार पाणी पितात. त्यामुळे आपल्याला दररोज किमान 8 ते 12 लिटर पाणी पिण्याची आवश्यकता आहे.. याशिवाय आवाज गोड ठेवण्यासाठी गोड फळे आणि पाणीदार भाज्यांचे सेवन करणे गरजेचे आहे.

चुकीचे आवाज काढणे

काही लोकांना अशी सवय असते की ते गंमतीने किंवा विनोद करताना चुकीचे आणि अनाठायी आवाज काढतात. मोठ्याने ओरडणे, मोठ्याने आरडाओरड करणे यामुळे व्होकल कॉर्डवर वाईट परिणाम होतो. या व्होकल कॉर्डसना अशा आवाजांसाठी अनेक किंवा मोठ्या प्रमाणात कंपन निर्माण करावे लागते आणि त्यामुळे व्होकल क़ॉर्ड खराब होऊ शकतो. त्यामुळे कमी आवाजात आणि गोड बोलल्याने आवाजाचा दर्जा चांगला राहतो.

खूप जास्त कॅफिनयुक्त पेय घेणे

दारूच्या व्यसनामुळे अनेक आजार होतात. अल्कोहोलमुळे व्होकल कॉर्डवर देखील परिणाम होतो. आवाजाच्या बाबतीत दारू पिणे ही चांगली सवय नाही. याशिवाय चहा, कॉफी यांसारख्या कॅफिनयुक्त पेयांचे सेवन केल्याने आवाजावर आणि व्होकल कॉर्डवर वाईट परिणाम होतो. स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्यापेक्षा चांगले दुसरे कोणतेच पेय नाही.

घसा वारंवार साफ करणे

घसा खवखवणे ही एक सामान्य समस्या आहे, जे काही काळ शांत राहिल्यानंतर निघून जाते. पण जर तुम्ही सतत घसा साफ करत राहिल्यास, या सवयीमुळे व्होकल कॉर्ड खराब होते. जर तुम्हाला घसा खवखवत असेल तर याचा अर्थ व्होकल कॉर्डला थोडा ओलावा हवा आहे. अशा परिस्थितीत, घसा साफ करण्याऐवजी थोडे पाणी पिणे चांगले असते

आवाजातील जडपणा धोकादायक असू शकतो

जास्त बोलणे किंवा घसा दुखणे यामुळे आवाजात कोरडेपणा येतो. याचे कारण कर्करोग हे देखील असू शकते. त्यामुळे बेफिकीर राहू नका ते धोकादायक ठरू शकते. आवाज हा व्होकल कॉर्ड्सच्या नळीमधून निघतो ज्याला आपण स्वर नलिका म्हणतो. कमी किंवा जास्त व्होकल कॉर्ड्सच्या उपस्थितीमुळे स्वरांमध्ये चढ-उतार होतात. व्होकल कॉर्ड्सला किंचितही सूज आल्याने आवाजात बदल होतो. याचे कारण म्हणजे स्वरयंत्राच्या अतिवापरामुळे उद्भवणारी समस्या होय.. उदाहरणार्थ, ओरडणे, भाषण देणे, मोठ-मोठ्या आवाजात भजन आणि कीर्तन म्हणणे यांचा स्वरयंत्रावर परिणाम होतो.

आवाजात जडपणा येणे म्हणजे संसर्ग झाल्याची लक्षणे आहेत

आवाजाच जडपणा हा दीर्घकाळ राहिल्यास तो गंभीर व्होकल डिसऑर्डर असू शकतो. घशाला दुखापत, सर्दी,-पडश्यामुळेही आवाजात जडपणा येतो. व्होकल कॉर्ड्स नियंत्रित करणाऱ्या स्नायूंना जर दुखापत झाल्यास, व्होकल कॉर्ड्स नीट हालचाल करू शकत नाहीत. त्याचा आवाजावर परिणाम होतो. या स्नायूंमधील सूज मुळे आवाजाच्या मार्गात अडथळा निर्माण होतो.

आपला घसा स्वच्छ ठेवा

 • बोलताना आपला कमी आवाजात बोलले पाहिजे.
 • गरम पाण्यात चिमूटभर मीठ टाकून गुळणा केल्याने देखील जडपणा दूर होतो.
 • आजारी व्यक्तीने थंड पाणी, थंड पेय, आईस्क्रीम खाणे, थंड पेय पिणे टाळावे.
 • गळ्याभोवती गरम कपडा किंवा मफलर गुंडाळल्याने फायदा होतो.

लॅरिन्जाइटिस (स्वरयंत्राचा दाह) काय आहे?

लॅरिन्जायटीस हा घशाचा एक आजार आहे. बोलण्याचा प्रयत्न करूनही तोंडातून आवाज येत नसेल, तर ते लॅरिन्जायटीसचे लक्षण आहे. त्यामुळे खूप कमी आवाजात बोलता येतो. लॅरिन्जायटीस हा रोग कमी आणि दीर्घ कालावधीचा असू शकतो.

लॅरिन्जायटीस संसर्गामुळे व्हॉईस बॉक्सला सूजन येते जे व्होकल कॉर्ड आहे. साधारणपणे व्होकल कॉर्ड्स आरामात उघडतात आणि बंद होतात, ज्यामुळे त्यांच्या हालचालीतून आवाज येतो. लॅरिन्जायटीस या आजारामुळे व्होकल कॉर्ड्सला सूज आणि वेदना होतात, त्यामुळे घशातून योग्य एसा आवाज येत नाही.

बहुतेक प्रकरणांमध्ये, लॅरिन्जायटीसची लक्षणे ही कमी कालावधीसाठी असू शकतात आणि ते किरकोळ विषाणूच्या संसर्गामुळे होऊ शकतात. पण कधीकधी लॅरिन्जायटीसची लक्षणे ही तीव्र किंवा दीर्घकाळापर्यंत असू शकतात. लॅरिन्जायटीसची लक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात-

गंभीर लॅरिन्जायटीसची लक्षणे

 • तीव्र जूना लॅरिन्जायटीस
 • जंतुसंसर्ग
 • ओरडणे किंवा बोलणे यामुळे घशाचा ताण
 • जिवाणू संसर्ग जसे की डिप्थीरिया

जर हा रोग तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकला तर त्याला क्रॉनिक लॅरिन्जायटीस म्हणतात. यामुळे व्होकल कॉर्डवर दबाव येऊ शकतो, दुखापत होऊ शकते किंवा व्होकल कॉर्डच्या विकासावर परिणाम होऊ शकतो.

सावधगिरी: काय काळजी घ्यावी

 • स्मोकिंग केल्याने घसा कोरडा होतो आणि व्होकल कॉर्डला नुकसान होते, त्यामुळे स्मोकिंग बंद करावे
 • अल्कोहोल आणि कॉफीच्या सेवनामुळे पाणी कमी होते, त्यामुळे कॅफिन आणि अल्कोहोलचे पेय बंद करावे
 • मसालेदार अन्न खाण्याचे टाळावे.
 • आहारात संपूर्ण धान्य, फळे आणि भाज्यांचा समावेश करावे.
 • व्हिटामिन A, E, आणि K जीवनसत्त्वे ही घशातील श्लेष्मल त्वचा निरोगी ठेवतात. त्याचा आहारात समावेश करावे

या तंत्रांच्या मदतीने उपचार शक्य आहे

लॅरींगोस्कोपी- यामध्ये डॉक्टर स्वरयंत्राची तपासणी करतात ज्याला लॅरिन्गोस्कोपी म्हणतात. यात लाईट आणि लहान आरशांच्या मदतीने इलाज केले जाते किंवा डॉक्टर फायबर-ऑप्टिक लॅरिन्गोस्कोपी देखील करू शकतात.

बायोप्सी- डॉक्टरांना कोणत्याही भागात समस्या दिसल्यास ते बायोप्सी करू शकतात. यामध्ये टिश्यूचा नमुना घेतला जातो आणि त्याची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी केली जाते.

व्होकल थेरपी- आवाजाच्या अतिवापरामुळे हा त्रास होत असेल तर ही थेरपी वापरता येते.

बातम्या आणखी आहेत...