आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Voting Begins For 19 Seats In 8 States, Unopposed Election For 5 Seats In 2 States

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यसभेच्या 24 जागांवर निवडणूक:8 राज्यांच्या 19 जागांसाठी मतदान सुरू, 2 राज्यांच्या 5 सीटवर बिनविरोध निवड

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मध्य प्रदेशच्या 3 जागांमधील 2 वर भाजपा, 1 वर काँग्रेस जिंकण्याची शक्यता
  • राजस्थानच्या 3 जागांमधील 2 वर काँग्रेस, 1 वर भाजपाचा विजय होणार असल्याचे मानले जात आहे

राज्यसभेच्या 19 जागांसाठी 8 राज्यांमध्ये मतदान सुरू आहे. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान सुरु असणार आहे. तर संध्याकाळी 5 वाजेपासून मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे. दहा राज्यांच्या 24 जागांवर निवडणूक होणार होती. मात्र 2 राज्यांच्या 5 जागांवर बिनविरोध उमदेवार निवडण्यात आले. गुजरातच्या 4 मधील 2 सीटवर भाजपा आणि एका जागेवर काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात आहे. तर 1 जागेवर कोण निवडूण येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

आमदारांच्या आकड्यांनुसार मध्यप्रदेशच्या 3 जागांमधील 2 वर भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. एक सीट काँग्रेसच्या खात्यात जाऊ शकते. राजस्थानमध्येही 3 जागांसाठी निवडणूक आहे. यामधील 2 वर काँग्रेस आणि एकावर भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. 

गुजरातच्या 4 जागा: तीन वर परिस्थिती स्पष्ट, एक जागेवर पेच कायम

भाजपा

आमदारः 103 राज्यसभेवर जागा जिंकण्यासाठी मतांची आवश्यकताः 35 अशाप्रकारे 2 जागांवरील विजय जवळजवळ निश्चित झाला आहे, तर तिसर्‍या जागेवर 2 मते कमी मिळतील

कॉंग्रेस

आमदार: 65 पाठिंबा : 3 एकूण: 68 राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी मतांची आवश्यकताः 35 एका सीटवर विजय निश्चित मानला जात आहे, 2 जागा जिंकण्यासाठी 2 मते कमी

उमेदवारभाजपाकाँग्रेस
1अभय भारद्वाजशक्ति सिंह गोहिल
2रामिलाबेन बाराभरत सिंह सोलंकी
3नरहरि अमीन

मध्य प्रदेशच्या 3 जागांचे गणित

भाजपा

आमदारः 107 पाठिंबाः 5 (2 अपक्ष + 2 बसपा +1 सपा) एकूण: 112 राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी मतांची आवश्यकता: 52 अशा प्रकारे, 2 जागांवर विजय निश्चित

कॉंग्रेस

आमदार: 92 राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी मतांची आवश्यकता: 52 अशा प्रकारे एका जागेवर विजय निश्चित 

दोन्ही पक्षांनी 2-2 उमेदवार उभे केले आहेत

उमेदवारभाजपाकाँग्रेस
1ज्योतिरादित्य सिंधियादिग्विजय सिंह
2सुमेर सिंह सोलंकीफूलसिंह बरैया

राजस्थानच्या 3 जागांचे गणित

कॉंग्रेस

आमदारः 107 पाठिंबाः 18 एकूण: 125 राज्यसभेच्या जागा जिंकण्यासाठी मतांची आवश्यकताः 51 अशा प्रकारे, 2 जागांवर विजय

भाजपा

आमदार: 72 पाठिंबा: 3 एकूण: 75 राज्यसभेच्या जागा जिंकण्यासाठी मतांची आवश्यकताः 51 अशाप्रकारे एक जागा निश्चित 

उमेदवारभाजपाकाँग्रेस
1राजेंद्र सिंह गहलोतके सी वेणुगोपाल
2ओंकार सिंह लखावतनीरज डांगी

झारखंडच्या 2 जागांचे गणित

झारखंड मुक्ती मोर्चा

आमदार: 29 राज्यसभेवर जागा जिंकण्यासाठी मतांची आवश्यकताः 27 अशाप्रकारे एका जागेवर विजय निश्चित 

भाजपा 

आमदार: 25 राज्यसभेवर जागा जिंकण्यासाठी मतांची आवश्यकताः 27 अशाप्रकारे एका जागेवर विजय निश्चित

कॉंग्रेस

आमदार: 15 उमेदवार उभा केला आहे मात्र विजयासाठी पुरेसे मत नाही

पार्टीझारखंड मुक्ति मोर्चाभाजपाकाँग्रेस
उमेदवारशिबू सोरेनदीपक प्रकाशशहजादा अनवर
बातम्या आणखी आहेत...