आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज ठरणार बाहू अन् बली:राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान, आघाडी- भाजपच्या जोरबैठका

दिल्‍ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभा सदस्यांमधून राज्यसभेवर पाठवायच्या ६ जागांसाठी शुक्रवारी (१० जून) मुंबईत मतदान होत आहे. सहाव्या जागेसाठी मोठी चुरस असून मतदानाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय बैठकांचा जोर दिसून आला. राज्यसभेसाठी महाराष्ट्रात २४ वर्षांनंतर मतदान होत असल्याने दोन्ही बाजूंकडून आपापल्या आमदारांना गुरुवारी मतदानाचे प्रशिक्षण देण्यात आले.

राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना न्यायालयाने मतदानाची संमती नाकारल्याने विजयी होण्यासाठी मतांचा कोटा घटला असून त्याचा लाभ भाजपला होऊ शकतो. तसेच विधानसभेतील एकूण २८८ सदस्यांपैकी शिवसेनेच्या एका आमदाराचे निधन झाले असून अनिल देशमुख-नवाब मलिक यांना मतदान करण्याची परवानगी मिळाली नाही तर मतांचा कोटा ४२ वरून ४१ वर येणार आहे. काँग्रेस आमदारांची पवईतील वेस्टईन हाॅटेलात बैठक पार पडली.

त्याला निवडणूक प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी मार्गदर्शन केले. भाजप आमदारांची बैठक कफ परेड येथील ताज प्रेसिडेंट येथे झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने ते बैठकीला हजर होते. शिवसेना नेत्यांची ट्रायडंट येथे बैठक झाली. वरळी येथील ब्लू सी हॉटेलमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली. किशोर जोरगेवार यांच्यासह काही अपक्ष आमदारांनी गुरुवारी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. काँग्रेस नेते पक्षाची बैठक संपल्यानंतर शरद पवार यांना सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेटले. १४ व्या विधानसभेत बहुतांश आमदार प्रथमच निवडून आलेले आहेत. १९९८ नंतर राज्यात राज्यसभेला मतदान झालेले नाही. त्यामुळे प्रत्येक पक्षाने मतदानाची रंगीत तालीम (माॅक वोटिंग) घेतली एमआयएम एक मत राष्ट्रवादीला व एक काँग्रेसला देण्याची शक्यता.

शिवसेनेचे नाराज आमदार तानाजी सावंत मतदानाला गैरहजर राहू शकतात. समाजवादीचे आमदार पहिले मत आघाडीला, तर दुसऱ्या पसंतीचे मत भाजपला देण्याची शक्यता. रासप आणि बविआ भाजपला मत देणार असल्याचे सांगितले

सहा जागा, आघाडी १६७, भाजप ११२; सहा आमदारांची झाकली मूठ

आघाडी + १६७ शिवसेना - ५५, राष्ट्रवादी - ५१ (दोन सदस्य तुरुंगात), काँग्रेस - ४४ अपक्ष ९ : किशोर जोरगेवार (चंद्रपूर), गीता जैन (मीरा भाईंदर), नरेंद्र भोंडेकर (भंडारा), आशिष जयस्वाल (रामटेक), संजय शिंदे (करमाळा), चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर), मंजुळा गावित (साक्री), विनोद अग्रवाल (गोंदिया), राजेंद्र यड्रावकर (शिराेळ). छोटे पक्ष ८ : समाजवादी पार्टी - २, प्रहार जनशक्ती पार्टी - २, माकप - १, शेकाप - १, स्वाभिमानी पक्ष - १, क्रांतिकारी शेतकरी पार्टी - १ भाजप + ११२ भाजप- १०६ छोटे पक्ष २ : जनसुराज्य पक्ष १, मनसे १ अपक्ष ४ : प्रकाश आव्हाडे- इचलकरंजी, राजेंद्र राऊत- बार्शी, महेश बालदी- उरण, रवी राणा- बडनेरा.

अनिल देशमुख, नवाब मलिकांच्या मतदानाचा आज हायकोर्टात फैसला
पीएमएल विशेष न्यायालयाने बिनखात्याचे मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राज्यसभेला मतदान करण्यास एक दिवसाचा जामीन नाकारला. या दोघांनी दुपारी उच्च न्यायालयात धाव घेतली. शुक्रवारी सकाळी ११ वाजता न्यायालय याप्रकरणी निकाल देणार आहे. मलिक आणि देशमुख यांचे मतदान होऊ न शकल्यास विजयासाठी मतांचा कोटा ४०.७१ येणार आहे.

चर्चांना उधाण
छोटे पक्ष,अपक्ष आमदारांना ५ कोटींपर्यंतची ऑफर दिल्याचे सांगितले जाते. निर्णय प्रलंबित बहुजन विकास आघाडी- ३, एमआयएम- २, रासप- १

बातम्या आणखी आहेत...