आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात निवडणुकीची घोषणा:1 आणि 5 डिसेंबरला मतदान, 8 डिसेंबरला निकाल

गुजरातएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

{निवडणूक आयोगाने गुजरातच्या १८२ विधानसभा जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली. निवडणूक दोन टप्प्यांत होईल. {पहिल्या टप्प्याचे मतदान १ डिसेंबरला (८९ जागा), तर दुसऱ्या टप्प्याचे ५ डिसेंबरला (९३ जागा) होईल. {मतमोजणी ८ डिसेंबरला होईल. याच दिवशी हिमाचल प्रदेश निवडणुकीचा निकालही जाहीर केला जाईल. {विधानसभेचा कार्यकाळ १८ फेब्रुवारी २०२३ रोजी संपत आहे. निवडणूक ११० दिवस आधीच घोषित केली आहे. {मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार म्हणाले, मोरबी घटनेमुळे आधी तारखा जाहीर करता आल्या नाहीत. {राज्यात ४.९ कोटींपेक्षा जास्त मतदार आहेत. ३.२४ लाख तरुण प्रथमच मतदान करतील. प्रथमच ३३ मतदान केंद्रे तरुण सांभाळतील.

भाजपची व्होटबँक स्थिर, जागा घटत आहेत पक्ष 2017 2012 2007 जागा (मते %) जागा (मते %) जागा (मते %) भाजप 99 (50.0%) 115 (47.9%) 117 (49.1%) काँग्रेस 77 (42.2%) 61 (38.9%) 59 (38.0%) अन्य 6 (7.8%) 6 (13.2%) 6 (12.9%)

गेल्या निवडणुकीनंतर अनेक काँग्रेस कार्यकर्ते भाजपमध्ये आले. यामुळे भाजपचे सदस्य वाढून १११ झाले. काँग्रेसचे आमदार घटून ६२ राहिले.

बातम्या आणखी आहेत...