आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:उपराष्ट्रपतिपदासाठी आज मतदान; लगेच मतमोजणी

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपराष्ट्रपतिपदासाठी आज, शनिवारी मतदान होईल. एनडीएकडून जगदीप धनखड आणि विरोधी पक्षांकडून मार्गारेट अल्वा हे उमेदवार आहेत. या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे ७८८ सदस्य मतदान करतात.

सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर लगेच मतमोजणी होईल आणि रात्री निकाल जाहीर केला जाईल. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपुष्टात येत आहे. धनखड यांचा विजय निश्चित आहे. जगदीप धनखड यांच्या बाजूने ५१५ व अल्वा यांच्या पारड्यात २०० मते पडतील, अशी अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...