आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

विकास दुबे एन्काउंटर:कानपूरपासून 17 किमी दूर भौतीत झाली चकमक; विकासला दोन गोळ्या लागल्या; एन्काउंटरमध्ये एसटीएफ जवानही जखमी

कानपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात विकास दुबे ठार, शुक्रवारी उज्जैन येथून केली होती अटक

बिकरू हत्याकांडातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड विकास दुबचा शुक्रवारी सकाळी कानपूर एसटीएफसोबत झालेल्या एन्काउंटरमध्ये ठार झाला. कानपूरपासून 17 किलोमीटर दूर भौती भागात हा एन्काउंटर झाला. सकाळी 6.15 आणि 6.30 दरम्यान ही चकमक झाली. 2 आणि 3 जुलै रोजी रात्री विकास आणि त्याच्या टोळीने बकरू गावात पोलिसांवर हल्ला केला. यात 8 पोलिसांचा मृत्यू झाला होता. 
पावसामुळे गाडी पलटी झाली

रिपोर्ट्सनुसार, गाडीत चालकाशिवाय तीन एसटीएफचे जवान होते. घटनेवेळी कानपूरमधील भौती भागात पाऊस सुरू होता. अरुंद रस्त्यावरील चिखलामुळे भरधाव गाडी पलटली. विकास मागील सीटवर बसलेला होता. त्याच्या शेजारी एसटीएफचे जवान होते. गाडी पलटी झाल्यानंतर विकासने पळून जाण्याचा प्रयत्न केला. एका पोलिस कर्मचाऱ्याची 9 एमएमची पिस्टल घेऊन तो पळाला. पोलिसांनी त्यास शरण येण्यास सांगितले, परंतु त्याने पोलिसांवर गोळीबार केला. यानंतर एसटीएफच्या जवाबी गोळीबारात एक गोळी त्याच्या कमरेला आणि एक छातीत लागली.
दोन पोलिस कर्मचारी जखमी

रिपोर्ट्सनुसार, या चकमकीत दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. विकास दुबे हॅलेट रुग्णालयात पोहचण्यापूर्वी जिवंत होता असे सांगितले जात आहे. नंतर त्याची प्रकृती गंभीर होती. काही वेळातच त्याचा रुग्णालयातच मृत्यू झाला. 

0