आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • W. Bengal: Now CM Has The Right To Appoint Vice Chancellor, Mamata Banerjee, Bill Passed

बदल:प. बंगाल : आता सीएमकडे कुलगुरू नियुक्तीचा अधिकार , ममताच कुलपती, विधेयक पारित

कोलकाता16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आता बंगालच्या सर्व विद्यापीठांत राज्यपालांऐवजी मुख्यमंत्री कुलगुरुंची िनयुक्ती करतील. बंगाल विधानसभेत सोमवारी विद्यापीठ कायदा सुधारित विधेयक २०२२ सादर केले. बाजूने १८२ आणि विरोधात ४० मते पडली. यात राज्यपालांना विद्यापीठ कुलपती पदावरून हटवत मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्याबबातचे विधेयक पारित केले. आता सरकारला सर्व विद्यापीठांतील प्रकरणांत वेगवेगळी विधेयके आणत पारित करावी लागतील. कारण ही विद्यापीठे स्वायत्त संस्था आहेत. त्यामुळे कायदेशीररीत्या कुलपतिपद राज्यपालांऐवजी इतर व्यक्तीला देण्यासाठी सुधारित विधेयक आणणे गरजेचे आहे. तिकडे सीएमना कुलपती नियुक्त केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत हा विद्यापीठाच्या स्वायत्ततेसाठी मोठा झटका असून हे लोकशाहीच्या भावनेविरोधात असल्याचे म्हटले आहे. सुधारित विधेयक पारित करण्यापूर्वी त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...