आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक भरती घोटाळा:प. बंगाल : सीबीआय तपासाचा एकल पीठाचा आदेश कायम

कोलकाताएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शिक्षक भरती घोटाळ्यात कलकत्ता सीबीआय तपासाचा एकल पीठाचा आदेश कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती सुब्रत तालुकदार व लपिता बॅनर्जी यांच्या खंडपीठाने शुक्रवारी एकल पीठास तपासाची निगराणी करण्याचे आदेश दिले. शिक्षक भरती घोटाळ्यात गरज भासल्यास व्यवहारांची तपासणी केली जावी, असे न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी स्पष्ट केले. न्यायालय म्हणाले, पश्चिम बंगाल प्रायमरी स्कूल बोर्डकडून लाभ मिळवणाऱ्या २६९ जणांना नोकरीवरून हटवण्याचा एकल पीठाचा आदेश कायम ठेवण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...