आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंताजनक:हिमालयात ब्लॅक कार्बनच्या प्रमाणात वाढ, संकटाची चाहूल, उत्तराखंडातील जंगलातील आगीवर वाडिया भूविज्ञान संस्थेचे संशोधन

मनमीतएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिमरेषा घटतेय, जीवजंतू व वनस्पतींवर होईल थेट परिणाम

उत्तराखंडातील जंगलात लागलेली भीषण आग उत्तरकाशी, सतपुली, श्रीनगर, मसुरी व नैनीतालपर्यंत पोहोचली आहे. यामुळे शहरांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. पौडीत राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्हीकडे आग विक्राळ झाल्याने वाहतूक थांबवण्यात आली. दरम्यान, या आगीमुळे हिमालयाची आधीपासूनच बिघडलेली स्थिती आणखीनच बिघडेल अशी भीती शास्त्रज्ञांना आहे. त्यांच्यानुसार गेल्या थंडीत सरासरीपेक्षा कमी हिमवर्षाव आणि आता आगीमुळे होणाऱ्या वायू प्रदुषणामुळे हिमनग ब्लॅक कार्बनच्या तावडीत सापडत आहेत. त्यांच्या वितळण्याचा वेग आधीपेक्षा जास्त झाला आहे. यामुळे पुन्हा संकट येऊ शकते.

वाडिया भूविज्ञान संस्थेच्या अहवालानुसार हिमालयातील हिमनगात ब्लॅक कार्बन आहे. त्याचे प्रमाण सरासरीपेक्षा अडीच पट वाढून १८९९ नॅनोग्रॅमवर गेले आहे. ब्लॅक कार्बनमुळे तापमानात वाढ होते. तो प्रकाश शाेषून घेण्यात अत्यंत प्रभावी असतो. यामुळे आर्क्टिक आणि हिमालयासारख्या हिमनगाच्या भागात बर्फ वितळतो. उत्तराखंड अंतराळ उपयोग केंद्राने (यूसेक) निष्कर्ष काढला आहे की, ३७ वर्षांत हिमाच्छादित क्षेत्रफळात २६ चौरस किलोमीटरची घट झाली आहे. या भागात आधी हिमरेषा ५२०० मीटर होती. आता ती ५७०० मीटरपर्यंत घटते किंवा वाढते. यामुळेच नंदादेवी बायोस्फीअर राखिवच्या ऋषिगंगा कॅचमेंटचा एकूण २४३ चौरस किमी भाग बर्फाच्छादित होता. मात्र, २०२० मध्ये तो २१७ चौरस किमी राहिला.

ऋषिगंगेच्या दक्षिण हिमनगात बदल
जंगलात लागलेली आग आता रहिवासी भागात पोहोचत आहे. पौडी जिल्ह्यातील धुमाकोटमध्ये प्राथमिक विद्यालयाची जुनी इमारत, फर्निचर, नोंदी आगीत खाक झाले. टिहरी जिल्ह्यातही आगीमुळे मोठे नुकसान झाले. यामुळे १२८ हेक्टर वनभूमी खाक झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय आपात प्रतिक्रिया दल (एनडीआरएफ) व वायुदलाचे दोन हेलिकॉप्टर पोहोचले. त्यांनी टिहरी तलावातून पाणी आणत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. राज्यातील एकूण १३०० हेक्टर वनभूमी आगीने वेढली आहे.

रहिवासी भागात पोहोचतेय आग
यूसेकचे संचालक आणि वरिष्ठ भूगर्भीय शास्त्रज्ञ प्रा. डॉ. एम. पी. एस. बिष्ट यांनी सांगितले की, ऋषिगंगा कॅचमेंट भागातील दक्षिण उतारातील हिमनगात बदल दिसून आला आहे. हिमनग वेगाने वितळत आहेत. नंदादेवी बायोस्फिअर रिझर्व्हचे हिमनग जर याच पद्धतीने वितळत राहिले तर आगामी काळात या भागातील जीवजंतू व वनस्पतींवर वाईट परिणाम होईल.

बातम्या आणखी आहेत...