आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Waliullah Sentenced To Death For Killing 18 People, Chain Bomb Blast In Varanasi On March 7, 2006

वाराणसी स्फोट:18 जणांच्या मृत्यूला जबाबदार वलीउल्लाला फाशीची शिक्षा, 7 मार्च 2006 रोजी झाला होता साखळी बॉम्बस्फोट

गाझियाबाद/लखनऊएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
वलीउल्ला गाझियाबादच्या डासना तुरुंगात कैद आहे. - Divya Marathi
वलीउल्ला गाझियाबादच्या डासना तुरुंगात कैद आहे.

उत्तर प्रदेशच्या वाराणसीत ७ मार्च २००६ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात १८ नागरिकांच्या मृत्यूस जबाबदार वलीउल्ला ऊर्फ टुंडाला गाझियाबाद जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. संकटमोचन मंदिर आणि दशाश्वमेध घाटावर झालेल्या स्फोटांत ३५ जखमी झाले होते. याच्याशी संबंधित ६ खटल्यांपैकी ४ मध्ये टुंडाला दोषी ठरवले. वाराणसीत टुंडाला वकील न मिळाल्याने खटला हायकोर्टाच्या आदेशानुसार गाझियाबादला हस्तांतरित करण्यात आली होती.

वलीउल्ला गाझियाबादच्या डासना तुरुंगात कैद आहे. ४ जून रोजी दोषी ठरवल्यानंतर टुंडाने ८० वर्षीय आई, पत्नी, मुलगा आणि मुलीची आर्थिक स्थिती आणि तुरुंगातील वर्तणुकीच्या आधारावर कमीत कमी शिक्षा देण्याची विनंती केली होती. न्यायालयाने एका प्रकरणात त्याला जन्मठेप तर दुसऱ्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली. दोन्ही खटले हत्या, दहशत पसरवणे, स्फोटक सामग्रीचा वापर आणि हत्येच्या प्रयत्नाचे कलम लावले होते. उर्वरित दोन खटल्यांत त्याच्यावर दंड ठोठावला. संकटमोचन प्रकरणात ४७ साक्षीदार आणि बचाव पक्षाचे ३ साक्षीदार सादर केले.

२००५ मध्ये अलाहाबादमध्ये वलीउल्लाला केली अटक
दशाश्वमेध घाट खटल्यात २० साक्षीदार आणि ३ बचाव पक्षाच्या साक्षीदारांच्या साक्षी सादर झाल्या. पोलिसांनी ५ एप्रिल २००६ रोजी अलाहाबादच्या फुलपूरचा रहिवासी वलीउल्लाला लखनऊच्या गोसाईगंजमधून अटक केली होती. अटकेनंतर त्याच्याकडून स्फोटके, डिटोनेटर आणि शस्त्रे मिळाली होती. या घटनेत सहभागी हूजी कमांडर शमीमसह तीन आरोपी अद्यापही पोलिसांच्या पोहोचबाहेर आहेत.

बातम्या आणखी आहेत...