आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजी-२० च्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यानंतर रशियाने शुक्रवारी रायसीना डायलॉगमध्ये गर्जना केली. रशियन परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी युक्रेनवरील हल्ल्याबाबत देशाची स्पष्ट भूमिका मांडली तेव्हा सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. लावरोव्ह म्हणाले, ‘एकेकाळी अमेरिकी परराष्ट्रमंत्री कॉलिन पॉवेल यांनी खिशातून बॉटल काढून पावडर दाखवले होते. ते देशासाठी धोका असल्याचे सांगत इराकमध्ये युद्ध पुकारले. मग अमेरिका व सहकारी देश कोणतेही ठोस कारण नसताना कोठेही हल्ला कसा करतात, हे सांगितले. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पाश्चात्त्य देशांनी इराण, अफगाणिस्तान, लिबियावरही हल्ले केले. तेव्हा का प्रशन उपस्थित केले नाहीत?’ ते म्हणाले, तुम्ही कधी अमेरिकनांना विचारले की, हजारो किमी दूर अफगाणिस्तानच्या हितांना धोका असल्याचे सांगत युद्ध का पुकारले?
युक्रेनवर हल्ल्याचे कारणही सांगितले
लावरोव्ह म्हणाले, युक्रेनमध्ये आमच्या हितांवर कसा वार होत आहे, याचा इशारा आम्ही एक दशकापर्यंत देत राहिलो. अल्पसंख्याक रशियनांवर अन्याय झाला. रशियनांविरोधात प्रत्येक प्रकारचे युद्ध पुकारण्यात आले. रशियन भाषाही युक्रेनियन राष्ट्रपतींनी एक झटक्यात रद्द केली.
युक्रेनमध्ये रशियन भाषा नाकारण्यात आली, तरीही जग गप्प राहिले?
लावरोव्ह म्हणाले, १-२ मार्च रोजी जी-२० परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत पाश्चात्त्य देशांनी रशियन लष्कर मागे घेण्याची मागणी केली होती. आयर्लंडमध्ये इंग्रजी रद्द करण्यात आली? फिनलंडमध्ये स्वीडिश नाकारली जाऊ शकते? नसेल तर युक्रेनमध्ये रशियन भाषा नाकारल्यानंतर जग गप्प का राहिले?
रशियाने स्पष्ट केला हेतू... रशियन
परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी रशियाचा हेतूही स्पष्ट केला. ते म्हणाले, पाश्चात्त्य देश म्हणत आहेत की, रशियाला हरवणे हा त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यांनी आमचे उत्तर ऐकावे. हे युद्ध जिंकणेही आमच्या अस्तित्वाशी संबंधित आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.