आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील DRDO च्या एका कार्यालयात कार्यरत असलेल्या DRDO च्या एका शास्त्रज्ञाला एटीएसने हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. तो व्हॉट्सअॅप संदेश, व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉल, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या ऑपरेटिव्हच्या संपर्कात असल्याचे दहशतवादविरोधी पथकाने (ATS) म्हटले आहे.
संवेदनशील माहितीशी तडजोड
जबाबदार पदावर असूनही, DRDO अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करून संवेदनशील सरकारी गुपितांशी तडजोड केली, जी शत्रू राष्ट्राच्या हाती पडल्यास भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो असेही दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) म्हटले आहे.
गुन्ह्याची नोंद
महाराष्ट्र पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक, काळाचौकी, मुंबई, यांनी अधिकृत गुप्तता कायदा 1923 च्या कलम 1923 आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास तपास अधिकारी करत असल्याचे पथकाने म्हटले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.