आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Waste In Ganga Cleaning Work; The NGT Said That The Departments Should Not Shift The Responsibility To Each Other, They Should Work In Coordination

स्वच्छता:गंगा स्वच्छतेच्या कामात कुचराई; एनजीटीने फटकारले, विभागांनी परस्परांवर जबाबदारी ढकलू नये, समन्वयातून काम करावे

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) गंगेच्या उपनद्यांमधील अस्वच्छता पाहून उत्तर प्रदेश सरकारला मंगळवारी फटकारले आहे. एनजीटीचे अध्यक्ष ए.के. गाेयल यांच्या अध्यक्षतेखालील पीठ म्हणाले, गंगेच्या उपनद्या अतिशय प्रदूषित आहेत. या नद्यांच्या स्वच्छतेसाठी याेग्य ती पावले उचलण्यात आली नाहीत. उलट सरकारी विभाग परस्परांवर जबाबदारी ढकलू लागले आहेत, असे संस्थेने फटकारले.

गंगेची उपनदी हिंडन व्यावसायिक रूपाने मृत झाली आहे. पर्यावरण व लाेक आराेग्याच्या दृष्टीने तिला पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे. शहरी विकास, सिंचन, जल महामंडळ, पर्यावरणासह संबंधित विभाग तिच्या देखभालीचे काम करत आहेत. काली, कृष्णा, हिंडन नद्यांमध्ये साेडण्यात आलेल्या नाल्यातील पाण्याचे परीक्षण करण्यात यावे. त्या प्रवाहाला गटार शुद्धीकरण संयंत्राशी जाेडण्यात यावे. एनजीटीने उत्तर प्रदेशच्या सचिवांना नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या समन्वयाचे काम करावे, अशी सूचना केली. परस्परांना जबाबदार धरण्यापेक्षा हिंडनच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी याेग्य पावले उचलण्याची गरज आहे, असे एनजीटीने सुनावले आहे.

पीठाचे निर्देश : मुदतीचे पालन न केल्यास पर्यावरणासंबंधी दंड वसूल करावा, १७५ दिवसांत उत्तर मागवले एनजीटी म्हणाले, उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या कार्ययाेजनेनुसार सर्व विभागांनी समन्वय करावा. मुदतीचे पालन न करणाऱ्यांकडून पर्यावरणसंबंधी दंडाची वसुली करावी. एनजीटीने मुख्य सचिवांना २ फेब्रुवारी २०२१ पर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले .

बातम्या आणखी आहेत...