आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी रुग्णालयात बसवले चार नवीन वॉटर कुलर:रुग्णालयाच्या दुर्दशेवर पांघरूण घालण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमधील पूल दुर्घटनेनंतर आज तिसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मोरबीला पोहोचले. येथे त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. नरेंद्र मोदी मोरबी रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी संपूर्ण रुग्णालयात रंगरंगोटी आणि पेंटिंगसह अनेक महत्त्वाची कामे प्रशासनाने केली.

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी रुग्णालयात चार नवीन वॉटर कुलरही बसवण्यात आले. मात्र, अधिकाऱ्यांना घाईमुळे यापैकी एकाही कुलरचे कनेक्शन मिळू शकले नाही. त्यामुळे कुलर बसवूनही रुग्णांना त्यांच्याकडून थंड पाणी मिळू शकले नाही.

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी अधिकाऱ्यांनी घाईघाईत वॉटर कुलर लावला होता.
पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी अधिकाऱ्यांनी घाईघाईत वॉटर कुलर लावला होता.

पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी मोरबी सरकारी रुग्णालयात काही रुग्णांची निवड करण्यात आली होती. ज्यांना नव्याने रंगवलेल्या वॉर्डमध्ये नवीन बेडवर हलवण्यात आले होते. नवीन वॉर्डात पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेण्यात आली. रुग्णालयाच्या दुर्दशेवर पंतप्रधानांसमोर पांघरूण घालण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला.

यावरून विरोधकांनी राज्यातील सरकार आणि पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. आम आदमी पक्षाने म्हटले की, 141 लोकांचा मृत्यू झाला असून, शेकडो लोक बेपत्ता आहेत. दोषींवर अद्याप कारवाई करण्यात आली नाही आहे. पण, भाजपाचे कार्यकर्ते फोटोशूटच्या तयारीसाठी रंगरगोटी करण्यात व्यस्त आहेत.

नरेंद्र मोदी यांनी एसपी कार्यालयात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या 26 कुटुंबांचीही भेट घेतली. त्यांनी येथील अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. मोरबी येथे येताच पंतप्रधानांनी प्रथम घटनास्थळी जाऊन मच्छू नदीवरील तुटलेल्या पुलाची पाहणी केली.पीएम मोदींनी अपघातस्थळाची पाहणी केली. गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी त्यांना या घटनेची माहिती दिली.

30 ऑक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत झालेल्या मोरबी येथील पूल दुर्घटनेत आतापर्यंत 135 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अपघाताच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी नौदल आणि एनडीआरएफच्या पथकांनी मृतदेहांचा शोध सुरू केला आहे. गुजरातमध्ये बुधवारी एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...