आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय चलनावर आता महात्मा गांधींचे चित्र आहे. लवकरच काही नोटांवर नोबेल विजेते कवी रवींद्रनाथ टागोर आणि देशाचे ११ वे राष्ट्रपती, मिसाइल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे वॉटरमार्क चित्र बघायला मिळू शकते. प्राप्त अहवालानुसार केंद्रीय अर्थमंत्रालय, भारतीय रिझर्व्ह बँक काही नोटांच्या एका सिरीजवर कलाम आणि टागोर यांचे वॉटरमार्क चित्र वापरण्याबाबत विचार करत आहे. टागोर यांना नोबेल मिळाला होता, तर कलाम महान शास्त्रज्ञ होते. जर या मान्यवरांची चित्रे नोटांवर छापली गेली तर महात्मा गांधींशिवाय इतर मान्यवरांची आरबीआयकडून चित्र छापण्याची पहिलीच वेळ ठरेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.