आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • We Are Ready To Go To War Along With Talks With Chinese Army: General Narwane, 14th Round Of Indo China Military Talks

भारत-चीन वाद:चिनी सेनेशी चर्चेसोबतच आमची युद्ध करण्याचीही तयारी : जनरल नरवणे, पूर्व लडाख सीमेवरील तणावावरून भारत-चीनच्या सेनेत चर्चेची 14 वी फेरी

नवी दिल्ली/लडाख9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेनाप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनी म्हटले की, भारतीय सेना पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्यासोबत चर्चेसह सामरिक तयारी अशा दोन्ही मोर्चांवर भारतीय लष्कर ठामपणे आणि दृढतेने सामोरे जाईल. भारतीय सेना या क्षेत्रात उच्च पातळीवरील ऑपरेशनल तयारीत आहे.

भारत आणि चीन सेनेदरम्यान लडाख सीमेवरील तणाव निवळण्यासंदर्भात १४ व्या फेरीतील चर्चा सुरू असतानाच नरवणे यांनी वरील मत मांडले. ही चर्चा सकाळी ९.३० वाजता चुशुल-मोल्डो येथे होत आहे. सेनाप्रमुख नरवणे म्हणाले, ‘आम्ही चिनी पीएलएसोबत वार्तालापासह ऑपरेशनल तयारीही उच्च स्तरावर केली आहे.’ सेनाप्रमुख म्हणाले, भारतीय सेना चीनच्या नव्या भूमी-सीमा कायद्याच्या कोणत्याही परिणामांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या संभाव्य धोक्यावर जनरल नरवणे म्हणाले, पश्चिम मोर्चावर विविध लाँच पॅडवर अतिरेक्यांची संख्या वाढली आहे. वारंवार नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न होत आहे. यावरून पुन्हा एकदा आमच्या पश्चिमेकडील शेजाऱ्याचे नापाक मनसुबे स्पष्ट होतात. चीनसोबत बुधवारी सुरू झालेल्या सैन्य वार्तालापाच्या १४ व्या फेरीबाबत विचारले असता जनरल नरवणे म्हणाले, भारताला पेट्रोलिंग पॉइंट १५ (हॉट स्प्रिंग्ज) वरील मुद्याची सोडवणूक होईल, अशी आशा आहे. ४ डिसेंबरला नागालँडमधील गोळीबाराच्या घटनेचा तपास अहवाल एक-दाेन दिवसांत येण्याची अपेक्षा अाहे. या अहवालावरून याेग्य कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...