आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • We Are Unhappy With The Manner In Which Decisions Are Being Taken: Chief Justice NV Ramana

लवादातील नियुक्त्या:ज्या पद्धतीने निर्णय होत आहेत त्यामुळे आम्ही नाराज : सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाने देशातील विविध लवादातील (ट्रिब्यूनल) रिक्त पदे भरण्याबाबत केंद्र सरकारवर तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. एल. नागेश्वर राव यांच्या पीठाने म्हटले, ‘आम्ही खूप नाराज आहोत. सरकारने राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी) आणि आयकर अपिलीय न्यायाधिकरणात (आयटीएटी) नियुक्तीसाठी निवड समितीने सुचवलेल्या नावांकडे दुर्लक्ष करून प्रतीक्षा यादीतील नावे निवडली.’

सरन्यायाधीश म्हणाले, ‘ज्या तऱ्हेने कारभार सुरू आहे, शिफारशींवरून निर्णय घेतले जात आहेत त्यावर आम्ही नाराज आहोत. आम्ही मुलाखतीनंतर लोकांची निवड करतो आणि सरकार म्हणतेय आम्ही त्यांची निवड करणार नाही. मी एनसीएलटी निवड समितीचा सदस्य आहे. आम्ही न्यायालयीन सदस्यांसाठी ५३० आणि तांत्रिक सदस्यांसाठी ४०० वर लोकांच्या मुलाखती घेतल्या. सरकारला १० न्यायालयीन आणि ११ तांत्रिक सदस्यांची यादी दिली. न्यायालयीन यादीतून सरकारने पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या आणि सातव्या उमेदवाराची निवड केली. नंतर प्रतीक्षा यादीत पोहोचले.

युक्तिवादात केंद्र सरकारकडून अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल म्हणाले, निवड यादी संपल्यानंतर प्रतीक्षा यादीतून नावे निवडली गेली होती. सरकार पुनर्विचारासाठी तयार आहे. यावर सुप्रीम कोर्टाने विविध न्यायाधिकरणातील नियुक्तीसाठी दोन आठवड्यांची वेळ दिली.

बातम्या आणखी आहेत...