आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • We Can Proudly Say That The Largest COVID19 Vaccination Program Is Being Run In India Today PM Modi At Red Fort

मोदींकडून कौतुक:'जर आपल्याकडे स्वतःची लस नसती तर काय झाले असते...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले लसीकरण मोहिमेचे कौतुक

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपल्या मेहनतीचे फळ म्हणजे भारताला लसीसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागले नाही

देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन आज साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले आणि देशवासीयांना संबोधित केले. यावेळी देशभरात कोरोनाविरोधात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे. यासोबतच भारताला लसीसाठी इतर कोणत्याही देशावर अवलंबून राहावे लागत नाही म्हणत त्यांनी संशोधक, आरोग्य कर्मचारी, कोरोना काळात जनसेवा देणाऱ्या प्रत्येकाचे कौतुक केले आहे.

कोरोना लसीमध्ये स्वयंपूर्ण व्हा
मोदी म्हणाले, 'कोरोनाचा काळ प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या देशासमोर आव्हान म्हणून आला आहे. ही लढाईही संयमाने लढली गेली आहे. आपल्यासमोर अनेक आव्हाने होती. आपण देशवासीयांनी प्रत्येक क्षेत्रात विलक्षण वेगाने काम केले आहे. आपल्या उद्योजकांच्या मेहनतीचे फळ म्हणजे भारताला लसीसाठी इतर कोणत्याही देशावर अवलंबून राहावे लागले नाही.

जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम भारतात सुरू
भारताकडे स्वतःची लस नसती तर काय झाले असते याचा क्षणभर विचार करा. आपल्याला पोलिओ लस मिळवण्यासाठी किती वर्षे लागली. एवढ्या मोठ्या संकटात, जेव्हा संपूर्ण जगात महामारी आहे, तेव्हा आपण लस कशी मिळाली असती. भारताला मिळाली असती या नसती, किंवा कधी मिळाली असती. पण आज आपण अभिमानाने म्हणू शकतो की जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम आपल्या देशात चालू आहे.

हे दुःख कायम सोबत राहणार
मोदी म्हणाले की, आपल्याकडे श्रीमंत देशांकडे असलेल्या सुविधा नाहीत. दुसरीकडे आपली लोकसंख्या खूप आहे. आपली जीवनशैली देखील वेगळी आहे. सामान्य प्रयत्नांनंतरही आपण अनेकांना वाचवू शकलो नाही. यामुळे अनेक मुलांचे छत्र हरवले. त्यांच्या डोक्यावरील हात गेला, त्यांचे हट्ट पुरवणारे गेले. या असह्य वेदना आणि दुःखसोबतच राहणार आहे.

सर्वांचे कौतुक
'कोरोनाच्या संकटामध्ये आपले डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, स्वच्छता कर्मचारी, लस बनवणारे आपले संशोधक, कोट्यावधी देशवासी, ज्यांनी करोनाच्या काळात प्रत्येक क्षण जनसेवेत दिला, ते देखील आपल्या सगळ्यांच्या वंदनाचे अधिकारी आहेत' असे म्हणत सर्वांचे कौतुक केले आहे.

बातम्या आणखी आहेत...