आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • We Were Under Pressure From Students And Parents To Take JEE And Nit Exams, The Union Education Minister Claimed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना काळात परीक्षा:जेईई आणि नीट प्रवेश परीक्षा घेण्यासाठी आमच्यावर विद्यार्थी आणि पालकांकडून दबाव होता, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा दावा

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जेईई परीक्षा देणाऱ्या 80 टक्के उमेदवारांनी अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड केल्याची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची माहिती

जेईई आणि नीट प्रवेश परीक्षा ठरल्या वेळेतच होणार आहेत. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून तसं स्पष्टही करण्यात आले आहे. मात्र या परीक्षा घेण्यावरून केंद्र सरकारवर टीका होत आहे. दरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी या परीक्षा घेण्यावरून मोठा दावा केला आहे. जेईई आणि नीट परीक्षा घेण्यासाठी आमच्यावर दबाव होता असा दावा केंद्रिय शिक्षणमंत्र्यांनी केला आहे. डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

पालक आणि विद्यार्थ्यांचा होता दबाव

रमेश पोखरियाल निशंक म्हणाले की, विद्यार्थी आणि पालकांकडून सतत दबाव होत असल्यानेच परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. जेईई आणि नीट परीक्षेसाठी परवानगी का देत नाहीत यासाठी आम्ही सतत पालक आणि विद्यार्थ्यांच्या दबावात होतो. या परीक्षाबाबत विद्यार्थांना काळजी लागली होती. अजून किती वेळ अभ्यास करायचा ही चिंता त्यांना भेडसावत होती.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना

पुढे बोलताना ते म्हणाले की, दरम्यान जेईई आणि नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कऱण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना मास्क, ग्लोव्ह्ज, पाण्याची बाटली आणि सॅनिटायजर सोबत ठेवणे अनिवार्य असणार आहे, अशी माहिती रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. जेईई परीक्षेसाठी सुमारे साडे आठ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यातील 7 लाख 25 हजार विद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्ड डाउनलोड केल्याची माहिती रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली.