आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्या. धनंजय यशवंत चंद्रचूड बुधवारी देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. ते म्हणाले, ‘मी सर्व नागरिकांच्या हितांचे रक्षण करेल. तंत्रज्ञानात असो किंवा रजिस्ट्रीत वा न्यायिक सुधारणांत असो, मी प्रत्येक गोष्टीत नागरिकांची काळजी घेईल.’ न्यायपालिकेवरील लोकांचा विश्वास कसा टिकवणार, असे विचारल्यानंतर ते म्हणाले, ‘मी बोलण्यातून नाही, तर कार्यातून नागरिकांचा विश्वास जिंकेल.’
{न्या. चंद्रचूड १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत या पदावर राहतील. {वडिलांनंतर मुलगा सीजेआय होणे हे सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात प्रथमच घडले. वडील न्या. वाय. व्ही. चंद्रचूड देशाचे १६वेे सीजेआय होते.
शपथ घेतल्यानंतर न्या. चंद्रचूड पत्नीसोबत सुप्रीम कोर्टात आले. आपल्या चेंबरमध्ये राष्ट्रध्वजाला वंदन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.