आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Wealth Of UP MLAs । UP Assembly Elections । 9 Rich Candidates Lose । 366 Crorepati Candidates Joining House

UP विधानसभेत धनाढ्यांचा बोलबाला:टॉप 10 पैकी 9 श्रीमंत उमेदवार पराभूत, 366 कोट्यधीश सभागृहात जाणार, 30 आमदारांवर 3 कोटींहून जास्तीचे कर्ज

लेखक: राजेश साहू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकालानंतर हे स्पष्ट झाले आहे की, यावेळी 403 आमदारांपैकी 366 आमदार कोट्यधीश आहेत. यामध्ये सपाचे 111 आमदार आणि भाजपचे 233 आमदार कोट्यधीश आहेत. 37 आमदार असे आहेत ज्यांची संपत्ती 1 कोटींपेक्षा कमी आहे. यामध्ये 23 आमदार तर असे आहेत, ज्यांची संपत्ती 50 लाख ते 1 कोटींच्या दरम्यान आहे. फक्त दोनच आमदार असे आहेत ज्यांची संपत्ती 10 लाखांपेक्षा कमी आहे. सर्वच कोट्यधीश उमेदवार विजयी झालेत असे नाही. निवडणुकीत 1734 कोट्यधीश उमेदवार होते, मात्र केवळ 366 उमेदवारांना विजय मिळाला.

टॉप 10 श्रीमंत उमेदवारांपैकी 9 उमेदवार पराभूत झाले. असे 30 आमदार आहेत ज्यांच्यावर 3 कोटींहून अधिकचे कर्ज आहे. आज समजून घेऊयात आमदारांच्या पैशांचा गुणाकार...

सर्वप्रथम जिंकलेल्या 10 श्रीमंत आमदारांची नावे

मेरठ कॅंटमधील भाजप उमेदवार अमित अग्रवाल यांची एकूण संपत्ती 148 कोटी आहे. मुरादाबाद ग्रामीण मतदारसंघातून मोहम्मद नासीर सपाच्या तिकिटावर विजयी झाले. नासिर यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती 60 कोटी असल्याचे जाहीर केले आहे. बसपचे एकमेव विजयी आमदार उमाशंकर सिंह यांच्याकडे ५४ कोटींची संपत्ती आहे. खालील टेबलवरून टॉप 10 श्रीमंत आमदारांची संपत्ती जाणून घ्या.

आमदार

पक्ष

मतदारसंघ

संपत्ती

1

अमित अग्रवाल

भाजप

मेरठ कँट

148 कोटी

2

मो. नासिर

सपा

मुरादाबाद ग्रामीण

60 कोटी

3

राकेश पांडे

सपा

जलालपूर

59 कोटी

4

रानी पक्षालिका सिंह

भाजप

बाह

58 कोटी

5

मयंकेश्वर सिंह

भाजप

तिलोई

58 कोटी

6

उमाशंकर सिंह

बसपा

रसाड़ा

54 कोटी

7

प्रवीण पटेल

भाजप

फुलपूर

40 कोटी

8

अखिलेश यादव

सपा

करहल

40 कोटी

9

राकेश सचान

भाजप

भोगनीपूर

37 कोटी

10

नंदगोपाल गुप्ता नंदी

भाजप

अलाहाबाद दक्षिण

37 कोटी

सर्वाधिक पैसे घेऊन निवडणुकीत उतरलेल्या 10 पैकी 9 जणांचा पराभव

नवाब काजील अली खान हे या विधानसभेचे सर्वात श्रीमंत उमेदवार होते. त्यांची एकूण संपत्ती 269 कोटी रुपये आहे. याशिवाय ओवैसी यांच्या AIMIM पक्षाचे उमेदवार शाह आलम ऊर्फ ​​गुड्डू जमाली यांच्याकडे 195 कोटींची संपत्ती आहे. सुप्रिया आरोन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती 147 कोटी आहे. हे सर्व उमेदवार पराभूत झाले.

उमेदवार

पक्ष

मतदारसंघ

संपत्ती

1

नवाब काजिल अली खान

काँग्रेस

रामपूर

296 कोटी

2

शाह आलम ऊर्फ गुड्डु जमाली

AIMIM

मुबारकपूर

195 कोटी

3

सुप्रिया ऐरन

सपा

बरेली कँट

147 कोटी

4

देवेंद्र नागपाल

भाजप

नौगांवा

140 कोटी

5

एसके शर्मा

बसपा

मथुरा

112 कोटी

6

राहुल यादव

सपा

सिकंदराबाद

100 कोटी

7

कुणाल सिंह

राष्ट्रीय परिवर्तन दल

सहसवान

88 कोटी

8

सहेंद्र सिंह रमाला

भाजप

छपरौली

84 कोटी

9

रईस अहमद

सपा

बदायूं

73 कोटी

सपा आमदारावर 23, तर बसपा आणि भाजप आमदारावर 13-13 कोटींचे कर्ज

जलालपूर मतदारसंघातून सपाच्या तिकिटावर विजयी झालेल्या राकेश पांडे यांच्यावर 23.22 कोटी रुपयांचे कर्ज आहे. मथुरा कॅन्टमधून आमदार झालेले अमित अग्रवाल दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्यावर 13.29 कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि बसपचे एकमेव आमदार उमाशंकर सिंह यांच्यावरही 13.02 कोटी रुपयांचे कर्ज आहे. एकूण 30 आमदारांवर 3 कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे. सर्वात मोठ्या 10 कर्जबाजारी आमदारांचे कर्ज पाहा.

आमदार

पक्ष

मतदारसंघ

कर्ज

1

राकेश पांडेय

सपा

जलालपूर

23.22 कोटी

2

अमित अग्रवाल

भाजप

मथुरा कँट

13.29 कोटी

3

उमाशंकर सिंह

बसपा

रसड़ा

13.02 कोटी

4

विकास गुप्ता

भाजप

अयाह शाह

12 कोटी

5

ओमकार

भाजप

नेहतौर

12 कोटी

6

राकेश सचान

भाजप

भोगिनीपूर

8 कोटी

7

सिद्धार्थ नाथ सिंह

भाजप

अलाहाबाद पश्चिम

7.60 कोटी

8

आर्यन खान

सपा

लखनऊ वेस्ट

6.71 कोटी

9

मारिया

सपा

मटेरा

5.83 कोटी

10

प्रकाश द्विवेदी

भाजप

बांदा

5.81 कोटी

114 आमदारांवर एक रुपयाचेही कर्ज नाही

निवडणुकीत विजयी झालेल्यांमध्ये 114 आमदार असे आहेत ज्यांच्यावर एका रुपयाचेही कर्ज नाही. यामध्ये आझम खान, सपा आघाडीच्या नाहिद हसन यांच्यासह 35 नावांचा समावेश आहे. भाजप आघाडीच्या 76 नावांमध्ये ब्रिजेश पाठक, आशुतोष टंडन, असीम अरुण यांचा समावेश आहे. बाहुबली आमदार रघुराज प्रताप सिंह ऊर्फ ​​राजा भैय्या कुंडा आणि काँग्रेस आमदार आराधना मिश्रा ऊर्फ ​​मोना आणि वीरेंद्र चौधरी यांच्यावरही कर्ज नाही.

टॉप 10 खटले असलेले सर्व उमेदवार सपाचे, 6 जणांवर कोणतेही कर्ज नाही

रामपूरमधून आमदार निवडून आलेले आझम खान यांच्यावर 87 गुन्हे दाखल आहेत. त्यांची संपत्ती 6 कोटी आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझमवर 43 गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. सरधानातून आमदार निवडून आलेले अतुल प्रधान तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याच्यावर 38 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावरही कर्ज नाही. अनिल कुमार त्रिपाठी यांनी 11व्या क्रमांकावर असलेल्या भाजप आघाडीच्या निषाद पक्षाकडून मेहदवालची जागा जिंकली. त्याच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर 3.48 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

बातम्या आणखी आहेत...