आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनुदानाचा लाभ:भारतात संपन्न ग्राहकांना स्वयंपाकाच्या गॅस अनुदानाचा जास्त लाभ, गरिबांना अनुदान 2 टक्क्यांनी कमी

नवी दिल्ली / धर्मेंद्रसिंह भदौरिया8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा अहवाल

भारतात सरकारने गरिबांना घरगुती गॅस देण्यासाठी अनेक योजना चालवल्या, परंतु संपन्न कुटुंबांच्या तुलनेत त्यांना एलपीजीवर अनुदान दुपटीने कमी मिळते. ही माहिती इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या ताज्या अहवालातून उजेडात आली आहे. जॉन्स हापकिन्स विद्यापीठासोबत संयुक्त रूपाने तयार या अहवालात भारतात एलपीजी अनुदानावर अभ्यास करण्यात आला. जास्तीत जास्त गरजूंपर्यंत लाभ मिळावा असा या अध्ययनामागील उद्देश आहे. परंतु प्रत्यक्षात गरिबांना अनुदानाचा कमी लाभ मिळत आहे.

अहवालानुसार ा झारखंडच्या सर्वात गरीब ४० टक्के कुटुंबीयांना २०१९ मध्ये ३० टक्क्यांहून कमी अनुदान मिळत होते. मे २०२० मध्ये सरकारने अनुदान थांबवले तेव्हा सिलिंडरच्या दरात घट झाली. परंतु अलीकडेच या किमती मे २०२० च्या ५९४ रुपयांहून वाढून मार्च २०२१ मध्ये ८१९ रुपयांवर गेल्या. त्याचा फटका म्हणून लाखो लोकांवर स्वयंपाकाच्या इंधनाचा खर्च उचलण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. गरीब कुटुंबात अनुदानाचे सिलिंडर केवळ ५.६ एवढे लागतात. नियोजित १२ सिलिंडरच्या दृष्टीने ही संख्या निम्मी आहे. म्हणूनच सिलिंडरचा वापर वाढत नाही तोपर्यंत सरकार अनुदानित सिलिंडरची सीमा १२ सिलिंडरवरून ९ सिलिंडर अशी करू शकते. अहवालाचे लेखन करणाऱ्या श्रुती शर्मा म्हणाल्या, गरीब कुटुंबांना अनुदानाची गरज आहे. चुका सूधारून योजना लागू करता येईल.

अनुदानित सिलिंडरचा संपन्न घरांत जास्त खप
अनुदानात सुधारणा करण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे संपन्न घरातील अनुदानित सिलिंडरचा जास्त वापर होय. त्यामुळेच त्यांना अनुदानही जास्त मिळते. ग्रामीण भागात एलपीजीऐवजी सरपण आणि बायोमास आधारित इंधनाचा वापर जास्त आहे.

बातम्या आणखी आहेत...