आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुढील चार दिवस राज्यात चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारने हाय अलर्ट जारी केला असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. दुसरीकडे, तीन देशांच्या दौऱ्यावरून परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी उष्णतेच्या लाटेला तोंड देण्यासाठी आणि आगामी मान्सून हंगामाच्या तयारी संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेणार आहेत.
ओडिशात ‘असानी’ चक्रीवादळाचा धोका
दुसरीकडे, हवामान खात्याचे म्हणणे आहे की चक्रीवादळाचे स्पष्ट चित्र अद्याप समोर आलेले नाही. तथापि, 5 मे पर्यंत ही प्रणाली डीप डिप्रेशन बनण्याची शक्यता आहे आणि 6 मे रोजी वादळ येण्याची शक्यता आहे. श्रीलंकेने या वादळाला असानी हे नाव दिले आहे. याचा अर्थ उद्रेक. त्याचा परिणाम पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, झारखंड, ईशान्येकडील राज्यांमध्ये दिसून येतो. गेल्या काही वर्षांपासून ओडिशा चक्रीवादळाचा सतत सामना करत आहे.
अनेक राज्यांना उष्णतेपासून मिळणार दिलासा
भारतीय हवामान विभागाने (IMD) येत्या काही दिवसांत दिल्ली, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि कर्नाटकसह देशातील अनेक भागांमध्ये ढगाळ आकाश आणि हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्याच वेळी, पुढील 3 दिवसांत, दक्षिण पश्चिम बंगालमधील झारग्राम, पश्चिम आणि पूर्वा मेदिनीपूर जिल्हे आणि दार्जिलिंग, कालिम्पॉन्ग, जलपाईगुडी, कूचबिहार आणि अलीपुरद्वार या सर्व हिमालयीन जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मध्य प्रदेश : 8 मे नंतर तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता
मध्य प्रदेशात मान्सूनपूर्व सरींनी उष्णतेपासून थोडासा दिलासा दिला असला तरी मे महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात नवतपा आधीच कडक उष्मा सुरू होईल (नवतपा म्हणजे सुर्य़ ज्यावेळी रोहिनी नक्षत्रात १५ दिवसांसाठी येतो, त्यावेळी त्या 15 दिवसांमधील सुरुवातीचे नऊ दिवस म्हणजे नवतपा) हवामान तज्ज्ञांच्या मते, 8 मे नंतर भोपाळसह राज्याच्या बहुतांश भागात पारा 44 ते 46 अंशांपर्यंत पोहोचू शकतो.
बिहार : पाटण्यात पावसाच्या हलक्या सरी, वातावरण झाले आल्हाददायक
बिहारमध्ये अचानक हवामान बदलले आहे. पाटण्यात गुरुवारी सकाळी पाऊस झाला. यानंतर वातावरण आल्हाददायक झाल्याने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला. पंजाब, पश्चिम बंगाल, हरियाणा आणि उत्तर प्रदेशचा प्रभाव असलेल्या बिहारमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची यंत्रणा सक्रिय होत आहे. या हंगामी कारणास्तव हवामान खात्याने 24 तासांचा इशारा जारी केला आहे.
UP: आज 12 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा
उत्तर प्रदेशातील हवामान विभागाने गुरुवारी 12 जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये प्रतापगड आणि जौनपूरमध्ये जोरदार वादळी वाऱ्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात मान्सूनपूर्व पावसाचा इशारा जारी करताना 15.5 मिमी पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या 24 तासात 0.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
झाशीमध्ये 43 अंशाच्या पुढे गेला पारा
उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात पुन्हा एकदा सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून, पारा 43.5अंश सेल्सिअस आहे. याशिवाय बांदा, कानपूर, वाराणसी, आग्रा या जिल्ह्यांचा उच्च तापमानाच्या जिल्ह्यांमध्ये समावेश आहे. या शहरांचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास राहते
झारखंड : मुसळधार पावसाची शक्यता
पावसामुळे रांचीसह संपूर्ण झारखंडमध्ये उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. रांची आणि हजारीबागमध्ये गारपीट आणि पाऊस झाला आहे. त्यामुळे वातावरण थंड झाले आहे. अशीच स्थिती 7 मेपर्यंत राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले. त्याच वेळी, वादळामुळे झारखंडमध्ये जोरदार वारा आणि गडगडाटासह चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
तेलंगणा: मुसळधार पावसामुळे रस्त्यावर तुंबले पाणी
हैदराबादमध्ये बुधवारी जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे संपूर्ण तेलंगणामध्ये तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळाला, परंतु पावसाने शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले. शहरातील काला पत्थर आणि याकूतपुरा जिल्ह्यातही पाणी साचले. नल्लकुंटामध्ये झाडे उन्मळून पडल्याने काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.