आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील बहुतांश भागांत पुढील दोन दिवसांत तापमान वाढेल. शुक्रवारी हवामान खात्याने सांगितले की, आर्द्रता आणि तीव्र उष्णतेमुळे अाेडिशा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ आणि तामिळनाडूत १३-१४ मेपर्यंत काहिली राहील. शुक्रवारी राजस्थानातील बांसवाडा जगातील सर्वात उष्ण भाग होता.
येथे ४७ अंश तापमानाची नोंद झाली. बिकानेर, चुरू, जैसलमेरसह राज्यातील ८ जिल्ह्यांत पारा ४५ अंशांपार होता. शुक्रवारपासून गुजरात, महाराष्ट्र, बिहार व पश्चिम बंगालच्या काही भागांत उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. राजस्थानात १३ मे व आंध्रच्या काही भागांत ४ दिवसांसाठी १६ मेपर्यंत तीव्र उष्णतेचा प्रकोप जाणवणार आहे.
भुसावळात ४५.७ सेल्सियस
भुसावळमध्ये शुक्रवारी यंदाच्या सर्वाधिक ४५.७ अंश तापमानाची नोंद केंद्रीय जल आयोगाने केली. नंदुरबारला ४४ व धुळ्यात ४३ तापमान होते. आयएमडीनुसार जळगावात ४४.९ अंश तापमान नोंद झाले. छत्रपती संभाजीनगरात पारा ४१.४ अंशांवर पोहोचला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.