आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Weather Update : Hurricane Barvi Could Hit The Southern Coast Of Tamil Nadu Today; Meteorological Department Warning

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अस्मानी संकट:तामिळनाडूच्या दक्षिण किनाऱ्यावर आज धडकू शकते बरवी चक्रीवादळ; हवामान खात्याचा इशारा

चेन्नई/तिरुअनंतपुरम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ताशी 90 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता, एनडीआरएफ पथके रवाना

बंगालच्या खाडीत दक्षिण-पश्चिमेकडून आलेले ‘बरवी’ चक्रीवादळ बुधवारी श्रीलंकेच्या किनारपट्टीवर धडकले. यामुळे वेगवान वाऱ्यांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. वादळ गुरुवारी दुपारपर्यंत तामिळनाडूच्या पमबन किनाऱ्यावर धडकू शकते. ते शुक्रवारपर्यंत कन्याकुमारीवरून जाण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळाबाबत भारतीय हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. वादळामुळे ताशी ७० ते ८० किमी वेगाने वारे वाहत असून त्याचा वेग ९० किमीवरही जाऊ शकतो. वादळामुळे पुढील ३६ तासांत तामिळनाडू , केरळमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. बंगालच्या खाडीत उत्तर-पश्चिमेकडे वादळाचा केंद्रबिंदू ताशी २५ किमी वेगाने पुढे सरकत आहे.

एनडीआरएफ पथके रवाना

तामिळनाडू सरकार म्हटले आहे की, एनडीआरएफची पथके कन्याकुमारी, तूतीकोरिन, तिरुनेल्लवेली व मदुरैकडे पाठवली जात आहेत. नागरकोइलमध्ये मदत छावणी उभारण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदींनी तामिळनाडू व केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून मदतीचे आश्वासन दिले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser