आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Weather Update | Marathi News | The Possibility Of Rain In 'this' State, When The Cold Is Decreasing; The Next Five Days Will Be Cloudy With Rain

पावसाची शक्यता:एकीकडे थंडीचे प्रमाण कमी होत असताना, 'या' राज्यात पावसाची शक्यता; पुढील पाच दिवस पावसासह राहणार ढगाळ वातावरण

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात एकीकडे थंडी कमी होत असताना दुसरीकडे मात्र पावसाने नागरिकांची तारांबळ उडत आहे. जम्मू काश्मीरसह दिल्लीमध्ये देखील आज पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. आता पुन्हा भारतीय हवामान विभागाने भारताच्या उत्तर-पश्चिम भागात येत्या 3 मार्चपर्यंत हलक्या स्वरुपात पाऊसाची शक्यता वर्तवली आहे.

'या' राज्यात पावसाची शक्यता?
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनूसार, येत्या 28 फेब्रुवारीपासून येत्या 3 मार्चपर्यंत पश्चिम हिमालयाच्या अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबत या भागात बर्फवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे. तर 2 मार्चला भारताच्या उत्तर-पश्चिम भागाच्या मैदानी भागात देखील पाऊस पडू शकतो. हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे यादरम्यान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीत पावसाची शक्यता आहे.

डोंगराळ भागात कसे असेल हवामान?

जम्मू-काश्मीर आणि लद्दाखच्या काही भागात आज पावसाच्या सरी बरसल्या. हवामान विभागाने म्हटले आहे की, येत्या 2 मार्चपर्यंत जम्मू-काश्मीर आणि लद्दाखच्या संपूर्ण परिसरात ढगाळ वातावरण राहील. पुढील पाच दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता आहे.

दिल्लीत पावसासह गारा पडल्या
दिल्लीत गेल्या 24 तासात 10 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. पाऊस सुरू असताना अनेक भागात पावसासह गारा देखील पडल्या आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितले की, दिल्लीच्या वायु गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा झाली आहे. आज सकाळी 9 वाजता 'मध्यम' श्रेणीत AQI 160 नोंदवला गेला.

शून्य आणि 50 मधील AQI 'चांगला', तर 51 आणि 100 मधील 'समाधानकारक', 101 आणि 200 दरम्यान 'मध्यम', 201 आणि 300 दरम्यान 'खराब', 301 आणि 400 दरम्यान 'अतिशय खराब' आणि एक 401 आणि 500 ​​मधील AQI 'गंभीर' मानला जातो.

बातम्या आणखी आहेत...