आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Weather Update । Rain In India, Uttarakhand Rising Amit Shah Carried Out Aerial Survey

पावसाचा कहर:पाऊस आणि भुस्सखलनामुळे उत्तराखंडमध्ये 55 जणांचा मृत्यू, गृहमंत्री अमित शहाने केली पूरपरिस्थिती पाहणी; नेपाळमध्येही 88 जणांचा मृत्यू

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतीच्या पावसाने भारतासह नेपाळमध्येही हाहाकार माजवला आहे. अनेक राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तराखंडमध्ये भूस्सखलन आणि पूरामुळे आतापर्यंत 55 जणांचा मृत्यू झाला आहे. मागच्या आठवड्यात केरळमध्ये देखील पावसामुऴे 42 जणांचा मृत्यू झाला होता. तर तिकडे मेपालमध्ये देखील पूरामुळे 88 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 30 जण अद्याप बेपत्ता आहे. भारत आणि नेपाळमध्ये पावसाने 185 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

उत्तराखंड : उत्तराखंड राज्यात पावसामुऴे 55 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक मृत्यू हे नैनीताल मध्ये झाले असून, 28 जणांचा मृत्यू झाला आहे. अल्मोड़ा 6, चंपावत 8, ऊधम सिंह नगर 2 आणि बागेश्वर जिल्ह्यात एका जणाचा मृत्यू झाला आहे. भूस्सखलामुळे एक घर देखील पडले असून, त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

राज्यात या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पुले देखील तुटली असून, काही भागात भुस्सखलन देखील झाले आहे. सध्या राज्यातील अनेक भागात सेनेकडून बचावकार्य मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.

पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शहा उत्तराखंड राज्याच्या दौऱ्यावर आहे. त्यांनी राज्यातील अनेक भागात पाहणी केली आहे. नैनीताल, अल्मोड़ा, हल्द्वानी मधील मार्ग सुरु करण्यात आले असून, पॉवर स्टेशन ऑपरेशन देखील सुरु करण्यात आले आहे. तर राज्यातील 80% भागात मोबाइल नेटवर्क देखील सुरु झाले आहे.

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे दोन मुलीसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका कुटुंबातील 10 जण पाण्यात वाहून गेले आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री जावेद अहमद खान यांनी सांगितले की, दार्जिलिंगमध्ये भुस्सखलन आणि पावसामुळे सुमारे 400 घराचे नुकसान झाले आहे. तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आले असून, दार्जिललिंगमध्ये आलेले अनेक पर्यटक अडकले आहे. भुस्सखलनामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाली आहे. हवामान विभागाने पश्चिम बंगालसाठी रेड अलर्ट जारी केले असून , दार्जिललिंग, कालिमपोंग आणि अलीपुरदार येथे आज पावसाची शक्यता आहे.

केरळ: मागच्या आठवड्यात केरळमध्ये पावसाने हाहाकार माजवला होता. त्यात सुमारे 42 जणांचा मृत्यू झाला होता. हवामान विभागाने पुन्हा केरळ अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

नेपाळ : मुसळधार पावसामुळे नेपाळमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे आतापर्यंत 88 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. भुस्सखलन झाल्यामुळे घर पडल्याने, त्याखाली अडकून त्यांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...