आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Weather Updates । Rainfall In Kerala Mp Up Uttarakhand Delhi Ncr Haryana West Bengal On 18 Oct

परतीच्या पावसाने देशात माजवला हाहाकार:केरळमध्ये अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण, 27 जणांचा मृत्यू; उत्तराखंडला देखील हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. देशातील परतीच्या पावसाचे वेगवेगळे चित्र पाहायला मिळत आहे. कुठे पाऊस मध्यम स्वरूपाचा पडत आहे. तर कुठे हा पाऊस जीवघेणा ठरत आहे. केरळमध्ये गेल्या गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

राज्यातील अनेक भागात महापूराची परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी दरडी देखील कोसळत आहे. आतापर्यंत राज्यातील विविध भागात पडणाऱ्या पावसामुळे आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण अद्यापही बेपत्ता आहे. रविवारी संध्याकाळी पुन्हा केरळातील कोट्टायम जिल्ह्यात पूरामुळे एक संपुर्ण घर वाहून गेले आहे. त्यावेळी घरात कोणीही राहत नसल्याने जीवीतहानी टळली आहे. आजुबाजूला असलेल्या नागरिकांनी त्याचा व्हिडीओ देखील मोबाईलमध्ये टिपले आहे.

वायुसेनेकडून बचावकार्य सुरु

वायुसेनेने केरळमध्ये बचाव कार्याला सुरुवात केली आहे. सेनेच्या तीन तुकड्या रवाना झाल्या असून, केरळमधील वेगवेगळ्या परिसरात जवान बचावकार्य करत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात नदी, नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी जवानांनी नागरिकांचे सुरक्षीत ठिकाणी स्थलांतर केले आहे. आतापर्यंत संपुर्ण राज्यात 27 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बेपत्ता आहे. वायुसेनेचे जवान त्यांचा शोध घेत आहे.

उत्तराखंडात रेड अलर्ट जारी

उत्तर भारतात देखील पावसाने हाहाकार माजवला आहे. मध्यप्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने आज पुन्हा उत्तराखंडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे चार धाम यात्रा देखील काही काळ थांबवण्यात आली आहे. तसेच शाळा देखील बंद करण्यात आले आहे.

मध्यप्रदेशमध्येही तुफान पाऊस

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या पट्ट्यामुळे मध्यप्रदेशात मुसळधार पाऊस होत आहे. गेल्या 24 तासापासून भोपाळमध्ये सलग पाऊस सुरु आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुक मंदावली आहे. इंदौर शहरासह होशंगाबादस बुरहानपुर आणि ग्वालियर या ठिकाणी देखील दोन ते तीन इंचापर्यंत पानी साचले आहे. लगातार सुरु असलेल्या पावसामुळे मध्यप्रदेश-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या बुरहानपुरचा महाराष्ट्र संपर्क तुटला आहे.

दिल्ली-NCR मध्येही जोरदार पावसाची शक्यता
दिल्लीत रविवारपासून पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिल्ली, नोएडा, गुरुग्रामसह आसपासच्या परिसरात हल्क्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...