आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Wedding Business Upto 50,000 Crore, Hotel 70 Per Cent Full; Some Companies Launch Multi video Conferencing Services For Weddings

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बँडवाजा अनलॉक:50 हजार कोटींची लग्नसराई, हॉटेल 70 टक्के भरली; काही कंपन्यांची लग्नासाठी मल्टी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सर्व्हिस सुरू

धर्मेंद्रसिंह भदौरिया/मनीषा भल्ला | नवी दिल्ली/मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनमुळे प्रलंबित विवाहांसोबतच कोरोनाची शक्यता पाहता जानेवारी-फेब्रुवारीत आता होणार लगीनघाई

लग्न समारंभांवरील बंदी सरकारने सप्टेंबरमध्येच मागे घेतली असली तरी खऱ्या अर्थाने २५ नोव्हेंबरला देवउठणी एकादशीनंतरच देशात लग्नाचा हंगाम अनलॉक होईल. कोरोनामुळे लग्नाची पद्धत बदलली हे नक्की. पाहुण्यांची संख्या मर्यादित असल्याने पैशाची बचत होत आहे. यामुळे लोक डेस्टिनेशन वेडिंगची इच्छा पूर्ण करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत डेस्टिनेशन वेडिंग्जची बुकिंग या वेळी २५ ते ३०% आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये केवळ नऊच मुहूर्त असल्याने हे अनलॉक विशेष आहे. केवळ लॉकडाऊनमध्ये राहिलेली लग्नेच नव्हे, तर २०२१ च्या सुरुवातीला लग्नाची तयारी करणारेही या हंगामात समारंभ करून घेऊ इच्छित आहेत. पुन्हा कोरोना वाढल्यास बंदी वाढण्याचीही लोकांमध्ये भीती आहे. स्थिती अशी आहे की, डिसेंबरमध्ये एका-एका दिवसात लाखो लग्ने आहेत. कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष (कॅट) बी. सी. भरतीया यांनी सांगितले की, देशात लग्नांचा व्यवसाय साडेचार ते पाच लाख कोटी रुपयांचा होतो. १४ डिसेंबरपर्यंत आमचा ६० कोटी हजार कोटींचा व्यवसाय होईल.

चित्रपट अभिनेत्री काजल अग्रवाल यांच्या सेलिब्रिटी वेडिंग प्लॅनर अंबिका गुप्ता सांगतात की, ज्यांना लग्नावर जास्त पैसे खर्च करायचे आहेत ते डेस्टिनेशन वेडिंग व ज्यांना कमी खर्च करायचा आहे ते आपल्याच शहरात ५०-१०० किलोमीटर लांब ऑफबीट लोकेशनवर जात लग्न करताहेत. यामुळे पाहुण्यांची यादी लहान झाली आहे. आधी लग्नात जे लोक १ हजार जणांना बोलवायचे ते आता २०-३० जणांनाच बोलवत आहेत. नव्या डेस्टिनेशनमध्ये पुद्दुचेरीतील ब्रिटिश काळातील इमारती पसंतीस येत आहेत. तसेच जयपूर, उदयपूर, जोधपूर, सोहना, मानेसर, मुंबईजवळ पुणे, लोणावळा, गोवा आणि चेन्नईजवळ महाबलिपुरमसारखी ठिकाणे भरली आहेत. गोवा टुरिझम अँड ट्रॅव्हल असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश शहा सांगतात की, लॉकडाऊन मागे घेण्याआधी हॉटेल ऑक्युपेन्सी १० ते १२% होती, जी आता ८० ते ९०% झाली आहे. ओयो वेडिंग डॉट इनचे सीईओ संदीप लोढा सांगतात की, लग्नांबाबत ७२% चौकशी कोविडपूर्व पातळीवर येत आहे. डेस्टिनेशन वेडिंग बुकिंगबाबत कंपनी कोविडपूर्व बुकिंगप्रमाणेच काम करू लागली आहे. बॉलीवूडनाच इव्हेंटचे संचालक राहुल वर्मा सांगतात की, एवढी लग्ने आहेत की श्वास घ्यायलाही सवड नसल्याने मुहूर्ताच्या पहिल्या दहा दिवसांतच संपूर्ण वर्षाचा व्यवसाय होऊ घातला आहे. बुकिंग बघता हॉटेलमालकांनी २५% दर वाढवले आहेत. देशात १, ७, ८, ९ व ११ डिसेंबरला जास्त विवाह आहेत. त्यानंतर पंजाबी, मुस्लिम, पारशी व इतर विवाह आहेत.

कोरोनामुळे ज्यांना लग्नात सहभागी होता येत नाही त्यांच्यासाठी थेट प्रसारण केले जाते. काही कंपन्यांनी लग्नांसाठी मल्टी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सर्व्हिस सुरू केली आहे. यात लग्नाचे सर्व विधी कव्हर केले जातात.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser