आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After A Week, The Twitter Accounts Of Many Leaders, Including The Congress, Were Restarted.

राहुल गांधींचे ट्विटर अनलॉक:आठवडाभरानंतर काँग्रेससह अनेक नेत्यांचे ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू, अनलॉक करताच काँग्रेसकडून 'सत्यमेव जयते' ट्विट

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्विटरने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट आठवडाभरानंतर पुन्हा चालू केले आहे. याशिवाय पक्षातील आणि इतर नेत्यांची अकाऊंटही अनलॉक करण्यात आली आहेत. यानंतर काँग्रेसच्या अधिकृत हँडलवरून 'सत्यमेव जयते' हे ट्विट करण्यात आले आहे.

दिल्लीतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची राहुल गांधी यांनी भेट दिली होती व त्याचे फोटो ट्वीट केले होते. याविरोधात राष्ट्रीय बालहक्क आयोगाने ट्विटरला नोटीस बजावल्यानंतर राहुल गांधींचे ट्विटर अकाऊंट बंद केले होते.

ट्विटर खाते पुन्हा सुरु होताच मुंबई यूथ काँग्रेसने 'सत्यमेव जयते' असे ट्विट केले आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी अकाऊंट पुन्हा सुरु केल्यानंतर ट्विटरवरला डिवचले आहे. त्यांनी ट्विट केले, 'प्रिय ट्विटर, जेव्हा तुम्ही माझी पोस्ट हटवू शकला असता तेव्हा तुम्ही माझे खाते का लॉक केले? मी माझे पोस्ट ना हटवली किंवा ना अपील केले, मग तुम्ही माझे खाते पुन्हा का सुरु केले केले? तुम्ही कोणाच्या दबावाखाली काम करत आहात?

ट्विटर हे भेदभाव करणारे व्यासपीठ - राहुल गांधी
राहुल गांधी म्हणाले, 'हा देशाच्या लोकशाहीवर हल्ला आहे. हा केवळ राहुल गांधींवर हल्ला नाही. माझे 19 ते 20 मिलियन फॉलोअर्स आहेत. तुम्ही माझे मत जाणून घेण्याचा अधिकार त्यांच्याकडून काढून घेत आहात. ट्विटर हे भेदभाव करणारे व्यासपीठ बनले आहे.

बातम्या आणखी आहेत...