आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Weekly TRP List Of News Channels Will Be Suspended For 8 To 12 Weeks; Broadcast Council BARC's Decision After The Republican Trp Scam

टीआरपी घोटाळा:सर्व वृत्तवाहिन्यांचे साप्ताहिक टीआरपी तात्पुरते केले बंद, टीआरपी घोटाळ्यानंतर ‘बार्क’चा निर्णय

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विखारी, अपशब्द आणि बनावट बातम्या आता चालणार नाहीत

टीव्ही रेटिंग पॉइंट (टीआरपी) जारी करणाऱ्या ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलने (बार्क) या संस्थेने कथितरीत्या टीआरपी घोटा‌ळ्यानंतर गुरुवारी वृत्तवाहिन्यांचे साप्ताहिक रेटिंग तात्पुरते बंद केले आहे. टीआरपीशी छेडछाडीचे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. बार्कने असा प्रस्ताव दिला आहे की, आमची तांत्रिक समिती टीआरपी डेटा मोजण्याच्या सध्याच्या प्रक्रियेचा आढावा घेईल. ती आणखी चांगली केली जाईल. ही प्रक्रिया हिंदी, इंग्रजी, प्रादेशिक आणि बिझनेस न्यूज चॅनल्सवर तत्काळ लागू केली जाईल. त्यासाठी ८ ते १२ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. वृत्त प्रसारण करणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या न्यूज ब्रॉडकास्टिंग असोसिएशनने (एनबीए) हा मोठा निर्णय असल्याची टिप्पणी केली आहे. आम्ही जी माहिती जमा करतो, तिची विश्वासार्हता बहाल करण्यासाठी आपल्या प्रक्रियेत मूलगामी बदल करावा, असा आग्रह एनबीएने बार्ककडे धरला आहे.

विखारी, अपशब्द आणि बनावट बातम्या आता चालणार नाहीत

एनबीएचे अध्यक्ष रजत शर्मा म्हणाले की, अलीकडच्या घटनांमुळे बार्कची प्रतिमा खराब झाली आहे. भ्रष्ट, तर्कहीन चढ-उतार असलेला हा डेटा भारतीय प्रेक्षकांच्या आ‌वडीची खोटी माहिती देत आहे आणि आमच्या सदस्यांवर पत्रकारितेचे आदर्श आणि मूल्यांच्या प्रतिकूल संपादकीय निर्णय घेण्याचा दबाव टाकत आहे. ते म्हणाले की, विखारी, अपशब्द आणि बनावट बातम्यांचे हे सध्याचे वातावरण आता चालणार नाही.

असे आहे प्रकरण : मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा केला होता उघड

मुंबई पोलिसांनुसार, काही वृत्तवाहिन्या यंत्रणेत हस्तक्षेप करत रेटिंग्जमध्ये घोटाळा करत होत्या. ज्या घरांत टीआरपी मीटर लावलेले होते, त्यांना पैसे देऊन आपले चॅनल सुरूच ठेवण्यास सांगितले जात होते. त्यामुळे बार्कच्या आठवड्याच्या रेटिंग्जवर खूप परिणाम होत होता. मात्र, या घोटाळ्यात ज्या वाहिन्यांची नावे आली त्यांनी अशा प्रकरणात सहभागी नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते. या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य आर्थिक अधिकारी एस. सुंदरम यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

रिपब्लिक मीडियाने सामान्यांप्रमाणेच आधी हायकोर्टात जावे : सुप्रीम कोर्ट

टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक ग्रुपला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील तीनसदस्यीय खंडपीठाने म्हटले की, ‘तुमचे कार्यालय मुंबईच्या वरळी येथे आहे. तुमच्या कार्यालयापासून जेवढे दूर फ्लोरा फाउंटन आहे, तेवढ्याच अंतरावर मुंबई हायकोर्टही आहे. त्यामुळे तुम्ही मुंबई उच्च न्यायालयात जाऊ शकता. सीआरपीसीनुसार चौकशीचा सामना करणाऱ्या कुठल्याही नागरिकाप्रमाणे आपणही हायकोर्टात जायला पाहिजे. आम्ही यावर सुनावणी करणार नाही.’ यानंतर रिपब्लिक ग्रुपने एफआयआर रद्द करण्याच्या मागणीची याचिका मागे घेतली.

बातम्या आणखी आहेत...