आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काेराेना महामारीदरम्यान रुग्णालयांत सातत्याने सेवा देणारे डाॅक्टर, आयसीयूत सज्ज आराेग्य कर्मचारी, प्रयाेगशाळा तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, परिचारिका, रेडिआेग्राफर यांच्या बचावासाठी असलेली पीपीई किट म्हणजेच पर्सनल प्राेटेक्टिव्ह इक्विपमेंट आजाराचे कारण ठरतेय. महाराष्ट्र, गुजरात,तामिळनाडू नंतर राजस्थानातदेखील सातत्याने पीपीई किट घालून सेवा देणाऱ्या डाॅक्टर तथा आराेग्य कर्मचाऱ्यांना चक्कर येणे, वजन कमी हाेणे इत्यादी समस्या जाणवल्या. जयपूरसह राज्यभरातील सरकारी व खासगी रुग्णालयातील अॅलाेपॅथी डाॅक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी, आयुष्य डाॅक्टरांची संख्या सुमारे ९० आहे. असे असले तरी महामारीमध्ये काेविड वार्डमध्ये डाॅक्टर जाेखीम पत्करून रुग्णांवर उपचार करू लागले आहेत. जयपूरच्या एसएमएस, आरयूएचएससह काेविडचा उपचार करणारे डाॅक्टर, परिचारिका, प्रयाेगशाळा तंत्रज्ञ यांचे गेल्या सहा महिन्यांत २ ते ६ किलाे वजन कमी झाले आहे. रुग्णांची सेवा करताना त्याबद्दल डाॅक्टरांनी तक्रारही केली नाही.
अशा प्रकारे वापर करा :
जागतिक आराेग्य संघटनेच्या सूचनेनुसार आधी गाऊन, फेस शील्ड, मेडिकल मास्क किंवा प्राेटेक्शन मास्क, हातमाेजे आणि नंतर शूज घातले जातात. हे सर्व साहित्य काढताना काेणाच्याही संपर्कात येता कामा नये. आधी गियरला काढा. नंतर गाऊन, हातमाेजे कचऱ्यात टाका. हात धुवून घ्या. नंतर फेस शील्डला मागील बाजूने काढून कचरा कुंडीत टाकावे. चष्मे, शूजवरील कव्हरही काढून हात स्वच्छ करणे अनिवार्य आहे. साेबतच बायाेमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट नियमांचे देखील पालन करावे.
जास्त घाम येणे : पीपीई किट घातल्यानंतर शरीराला हवा मिळत नाही. त्यामुळे जास्त घामामुळे कपडे आेले हाेतात. डाेळ्यांपर्यंत ताे येताे. त्यामुळे डाेळ्यांची जळजळही हाेते. हातमाेजे घातल्याने त्वचेचे विकार व हेड कव्हरमुळे डाेकेदुखी सुरू हाेते. सतत मास्क घातल्याने श्वास घेण्यासही त्रास जाणवताे.
परिधान केल्यानंतर : आठ तासांपर्यंत खाण्या-पिण्याच्या गाेष्टींपासून दूर राहावे लागते. संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छतागृहातही जाणेही बंद हाेते. माेबाइल, उपकरणांनाही स्वत:पासून दूर ठेवावे लागते. ड्यूटी पूर्ण झाल्यावर पीपीई किट काढून कचऱ्यात टाकावा लागताे.
जास्त वेळ असल्याने त्रास : किट जास्त वेळ घातल्याने वेळेवर जेवण हाेत नाही. त्यातून डिहायड्रेशनासारख्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. सातत्याने डिहायड्रेशन झाल्याने वजनही कमी हाेऊ शकते.
उकाडा आणि हाल : पीपीई किट आठ-आठ तास घालावे लागते. पीपीई किट घातल्याने रुग्णालयांत एसी किंवा पंखा देखील लावला जात नाही. कारण त्यामुळे संसर्ग पसरण्याची भीती असते. थंडीच्या वातावरणात संसर्ग वाढण्याचा धाेका असताे.
पीपीई किट ‘प्राेटेक्टिव्ह गियर्स’
पर्सनल प्राेटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई)प्राेटेक्टिव्ह गियर्स आहेत. त्यांची डिझाइन काेराेना विषाणू पीडितांवरील उपचार करणारे डाॅक्टर व परिचारिकांना सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने तयार केले आहेत. हे किट परिधान केल्यानंतर डाॅक्टर तसेच आराेग्य कर्मचारी रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतरही स्वत:चा संसर्गापासून बचाव करू शकतात. किटमध्ये चष्मा, फेस शील्ड, मास्क, हातमाेजे, गाऊन, हेड कव्हर व शू कव्हर इत्यादीचा समावेश आहे.
भास्कर एक्स्पर्ट पॅनल :
डाॅ. सुधीर भंडारी, डाॅ. राजेश शर्मा, डाॅ. एस.एम. शर्मा, डाॅ. रमन शर्मा, डाॅ. अजित सिंह, डाॅ. आशा वर्मा, डाॅ. पुष्पा नागर, डाॅ. कमल गाेयल, डाॅ. एन. बी. राजाेरिया.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.