आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bihar, Banka, Bihar News, Weird Excuses Of Teachers For Holidays In Bihar, Latest News And Update

'5 डिसेंबरला आई मरेल...सुट्टी द्या':बिहारमध्ये सुट्टीसाठी शिक्षकांचे विचित्र बहाणे; एक म्हणाला - रात्रीचे जेवण केल्याने पोट खराब होईल

पाटणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शालेय विद्यार्थ्यांनी सुट्टीसाठी वेगवेगळी कारणे देणे सर्वसामान्य गोष्ट आहे. पण बिहारचा गुरुजन वर्ग सुट्टीसाठी बहाणेबाजी करण्यात विद्यार्थ्यांहून एक पाऊल पुढे गेला आहे. त्यांनी आपल्या सुट्टीच्या अर्जात 'रात्रीचे जेवण केल्यामुळे पोट खराब होईल...सुट्टी द्या', तसेच 'माझ्या आईचे 5 डिसेंबरला निधन होणार असल्यामुळे मला सुट्टी हवी आहे,' अशी ना-ना प्रकारची कारणे दिली आहेत.

त्याचे झाले असे की, बांकातील सरकारी शाळेतील शिक्षकांना एका आदेशाद्वारे आकस्मिक सुट्टीसाठी किमान 3 दिवस अगोदर अर्ज करण्याचे आदेश देण्यात आलेत. या आदेशाला शिक्षक वर्गातून कडाडून विरोध होत आहे. यामुळे त्यांनी विचित्र बहाणेबाजी करून सुट्टीसाठी अर्ज केलेत. हे अर्ज आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बांकातील एका शिक्षकाने आपल्या अर्जात म्हटले आहे की, 'माझ्या आईचे 5 डिसेंबर रोजी निधन होणार आहे. त्यामुळे मला सुट्टी हवी आहे.' तर दुसऱ्या शिक्षकाने म्हटले आहे की, मी 6 डिसेंबर रोजी रात्रीच्या जेवणासाठी जाणार आहे. त्यामुळे माझे पोट खराब होण्याची शक्यता आहे. परिणामी मला 7 ते 9 डिसेंबरपर्यंत सुट्टी हवी आहे.' अशा प्रकारचे विविध अर्ज सध्या सोशल मीडियावर शेयर केले जात आहेत. लोक विरोध करण्याच्या शिक्षकांच्या या अनोख्या अंदाजाचे चांगलेच कौतुक करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला सुट्टीचा अर्ज.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला सुट्टीचा अर्ज.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अर्जात विषय आकस्मिक सुट्टी असे नमूद करून लिहिले आहे की- महोदय सविनय अर्ज सादर करतो की, मी 7 डिसेंबर ते 9 डिसेंबर रोजी माझे पोट खराब राहण्याची शक्यता असल्यामुळे मी शालेय कामकाजात उपस्थित राहू शकत नाही. कराण, मी 7 डिसेंबर रोजी एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात आहे. त्यात मी भरपेट जेवण करणार असल्यामुळे पोट खराब होणे साहजिकच आहे. त्यामुळे माझा 3 दिवसांच्या सुट्टीचा अर्ज मान्य करावा ही विनंती. हे पत्र शिक्षक नीरज कुमार यांनी लिहिले आहे.

सुट्टीसाठी आईच्या निधनाचेही कारण देण्यात आले आहे.
सुट्टीसाठी आईच्या निधनाचेही कारण देण्यात आले आहे.

याप्रकरणी भागलपूर विभाग शिक्षक संघाचे सदस्य अरुण कुमार सिंह यांनी सांगितले की, शिक्षकांना सुट्टीसाठी 3 दिवस अगोदर अर्ज करण्याचे आदेश देण्यात आलेत. हे चुकीचे आहे. सुट्टीसाठी 3 दिवस अगोदर अर्ज करण्याचा आदेश आम्ही केव्हाच ऐकला नाही. 3 दिवसांनंतर कोणते महत्त्वाचे काम येईल हे आज आपल्याला कसे कळेल. या नियमाला संपूर्ण शिक्षकांचा विरोध आहे.

बातम्या आणखी आहेत...